E-KYC : मोठी बातमी: सरकार 'या' 14000 महिलांना झटका देणार, मार्च महिन्यानंतर अनुदान बंद करणार?

Sanjay Gandhi Niradhar Scheme : संजय गांधी निराधार योजनेतील 14 हजार लाभार्थ्यी महिलांच्या अनुदानाला कात्री लागणार आहे. ज्या महिलांकडून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही, त्यांचे अनुदान मार्च महिन्यापासून बंद होणार आहे.
Sanjay Gandhi Niradhar Scheme
Sanjay Gandhi Niradhar SchemeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना जनतेसाठी राबवल्या जातात. यासाठी फक्त आधार कार्ड वापरले जाते. तर योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त ई केवायसीची अट सरकारची असते. पण आता ही अट पूर्ण न करणाऱ्या तब्बल 14 हजार महिलांच्या अनुदानाला कात्री लागणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यी महिलांनी आपले आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबरशी लिंक न केल्याने त्यांचे अनुदान बंद होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड हे बँक खाते आणि मोबाईल नंबरला लिंक करणे सक्तीचे आहे. तसाच नियम संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी असून आधार कार्डला बँक खाते आणि मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचं आहे. तर केवायसी पूर्ण केली नसल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 हजार महिलांचा याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 90 टक्के लाभार्थ्यी महिलांनी केवायसी पूर्ण केलेली आहे. पण ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे अनुदान बंद होणार आहे. पण अद्याप वेळ गेलेली नसून मार्चपर्यंत ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

निराधार महिलांना मासिक मदत ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देण्यात येते. यासाठी श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजना सुरू केलेली आहे. पात्र निराधार महिलेला प्रतिमाह 600 रूपयांची आर्थिक मदत सरकार करतं. पण आता याच मदतीसाठी ई- केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मार्चपर्यंत याची मुदत असून ज्या महिलांनी केवायसी केली नाही. त्यांची मदत बंद होणार आहे

Sanjay Gandhi Niradhar Scheme
One Nation One Subscription Scheme : नेमकी काय आहे 'वन नेशन वन सब्सक्रिप्श' योजना अन् कुणाला मिळणार लाभ?

जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 1 लाख 45 हजार 515 लाभार्थ्या महिला होत्या. यापैकी 14 हजार 159 महिलांनी केवायसी केलेली नाही. त्यांनी त्यांचे आपले आधार कार्ड तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाकडे अद्यात जमा केलेले नाहीत. त्यांना लाभ हवा असेल तर केवायसी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी केले आहे.

Sanjay Gandhi Niradhar Scheme
Tembhu Scheme News : शेतकऱ्यांना दिलासा! टेंभू योजनेचे आवर्तन सुरू होणार; रब्बीतील पिकांसाठी ठरणार लाभदायक!

यावेळी उपजिल्हाधिकारी चोरमारे म्हणाले की, संजय गांधी निराधार योजनेचे 1 लाख 45 हजार 515 लाभार्थ्या महिला आहेत. या योजनेत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून ई-केवायसीचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. पण अद्याप 14 हजार 159 महिलांनी केवायसी केलेली नाही. त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करुन घ्यावी. आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करून ई-केवायसी करून घ्यावे. अन्यथा त्यांचा लाभ मार्च महिन्यापासून बंद होईल, असा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com