Uddhav Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Congress vs Uddhav Thackeray : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना धोका, 'मविआ'त फूट? अमरावतीने समीकरण बदलले...

Amravati Teachers Constituency : काँग्रेसने उमेदवार जाहीर करत उद्धव ठाकरेंना धोका दिल्याची टीका करण्यात येत आहे. ठाकरेंनी एका महिन्यापूर्वीच दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी जाहीर केली होती.

Roshan More

Congress Politics : राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अमरावतीमध्ये बिघाडी झाली आहे. विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने अदिती पोहरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

एक महिन्यापूर्वी याच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसने येथे उमेदवार उभा करून ठाकरेंना धोका दिल्याची टीका करण्यात येत आहे.

दत्तात्रय लहाने यानी अदिती पोहोरेंच्या उमेदवारीवर बोलताना म्हणाले की, खरं म्हणजे हा खूप मोठा मतदारसंघ आहे. पाच जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. या जिल्हातील शाळांमध्ये पोहोचायला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे इतक्या कमी कालावधी त्यांना पोहोचणे शक्य नाही. मी मागील काही काळापासून तयारी करतो. दरम्यान, दुपारनंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे. या बैठकीत अमरावती शिक्षक मतदार संघाच्या जागेवरून पुन्हा चर्चा होणार आहे

पोहोरे यांच्या उमेदवारीने ठाकरेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. शिवाय महायुतीमध्ये देखील हा मतदारसंघ कोणाकडे यावरून वाद सुरू आहे. दरम्यान, दत्तात्रय लहाने म्हणाले की, उद्धव ठाकरेसाहेबांनी मला एका महिन्यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती. माझ्या सारख्या सामन्या कार्यकर्त्याचा हा मी सन्मान समजतो.

लहाने म्हणाले की, मी पाच तारखेला खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहे. आमदार नितीन देशमुख यासह राज्यातील प्रमुख नेते देखील या वेळी उपस्थित असणार आहेत.

महायुतीत धुसफूस?

शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांची उमेदवारी पक्की समजली जात असतानाच शेखर भोयर यांनी आपण भाजपचे उमेदवार म्हणून मैदानात असू असे सांगितले आहे.

भोयर म्हणाले, मी दोन वर्षांपूर्वी पक्षप्रवेश केला त्यावेळी पक्ष नेतृत्वाने मला कामाला लागण्याचे सूचना दिल्या होत्या.अजून पर्यंत उमेदवारी निश्चित झाली नाही. हा मतदारसंघ जर भाजपला सुटला तर निश्चितपणे मी भाजपचा उमेदवार असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT