Pune Teachers Mla Election : एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचे टेन्शन वाढणार, पुण्यात भाजप शिक्षक मतदारसंघ स्वबळावर लढणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने उत्सुकता वाढली!

Jaykumar Gore BJP Vs Mangesh Chivate : पुणे शिक्षक मतदारसंघात महायुती एकत्र लढणार की भाजप स्वबळावर लढणार याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.
Mangesh Chivate Eknath Shinde Pune Teachers’ Constituency
Mangesh Chivate Eknath Shinde Pune Teachers’ Constituencysarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शिक्षक मतदारसंघातून इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. महायुतीची ताकद पाहता येथे त्यांचा उमेदवार सहज विजयी होईल, असे अंदाज बांधले जात आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून शिक्षक मतदारसंघाची तयारी करणारे एकनाथ शिंदेंचे विश्वासू शिलेदार मंगेश चिवटे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

आपल्यालाच संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी महायुतीमधून आपल्याला पाठींबा मिळेल, असे देखील सांगितले होते. दरम्यान, या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे भाजप नेमकी काय भूमिका घेणार याची देखील चर्चा होत आहे.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढपूरमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. ते म्हणाले, पदवीधर मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदरासंघ हे महायुतीमधूनच लढण्याचा प्रयत्न आहे. मात्र, वेळ पडल्यास भाजप म्हणून या निवडणुकीला दोन्ही मतदारसंघात सामोरे जाऊ.

Mangesh Chivate Eknath Shinde Pune Teachers’ Constituency
Pune MLC Election Update: पुणे शिक्षक आमदारकीसाठी इच्छुक वाढले; पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून सुमारे ५३ हजार मतदार

उमेदवारी कोणाला?

गोरे यांच्या वक्तव्यामुळे भाजपकडून पुणे शिक्षक मतदारसंघावर दावा सांगितल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातून मंगेश चिवटे हे अनेक दिवसांपासून तयारी सुरू करत आहेत. तर, मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी सचिन सानप देखील याच मतदारसंघातून तयारी करत आहे. या दोन्ही संभाव्या उमेदवारांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच भाजप देखील ही निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याने महायुतीमध्ये नेमका काय निर्णय होणार याची उत्सुकता वाढली आहे.

मतदार किती?

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतील इच्छुकांची संख्या पाहाता ही निवडणूक चुरशीची होणार आहे. पाच जिल्ह्यांमध्ये या मतदारसंघाचे मतदार आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधून तब्बल ५२ हजार ८०० हून अधिक शिक्षक मतदारा आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा मोठा कस लागणार आहे.

Mangesh Chivate Eknath Shinde Pune Teachers’ Constituency
Amravati teacher constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघ: श्रीकांत देशपांडे पुन्हा मैदानात; पक्षाचे नाव ठरताच विरोधकांचे धाबे दणाणले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com