Pune : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यूपीएससीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले. त्यानंतर खेडकर यांनी वाशिम सोडले असून त्या नागपूरला गेल्याची चर्चा आहे. तिथून त्या मसूरीला जाणार की पुणे गाठणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
पूजा खेडकर यांनी यूपीएससीने तक्रार दिल्यानंतर मीडिया बोलताना न्यायव्यवस्था आपले काम करेल, असे विधान केले आहे. तसेच मी परत येणार असून नंतर तुमच्याश बोलेन, असे सांगत त्या गाडीत बसून निघून गेल्या.
खेडकर या वाशिममधून नागपूरकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. त्या कुठे जाणार आहेत, या प्रश्नावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. कार्यालयातून बाहेर पडण्यापुर्वी त्यांना वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचे पीए भेटले होते. त्यामागचे कारणही गुलदस्त्यात आहे. जवळपास 72 तास त्या वाशिममधील गेस्ट हाऊसमध्ये होत्या. तिथेच त्यांनी पोलिसांना बोलवून घेतले होते.
दरम्यान, खेडकर यांच्याविरुध्द फेरफार, फसवणूक, आयटी कायदा तसेच दिव्यांग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आपले नाव, ईमेल, मोबाईल, पत्ता बदलल्याचे यूपीएससीने केलेल्या चौकशीत समोर आले आहे. परीक्षेला बसण्याच्या संधी नसताना खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याची तक्रार यूपीएससीने दिली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांविरुध्द खेडकर यांनी तक्रार दिली आहे. ही तक्रार पुणे पोलिसांकडे वाशिम पोलिसांकडून वर्ग करण्यात आली आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याच्या दोन नोटिसा पुणे पोलिसांनी बजावल्या आहेत. तर मसूरी येथील प्रशिक्षण संस्थेनेतही खेडकर यांचे प्रशिक्षण रद्द करून त्यांना तातडीने बोलवून घेतले आहे. त्यांनी २३ जुलैपूर्वी हजर राहावे लागणार आहे.
खेडकर शुक्रवारी वाशिममधून बाहेर पडल्यानंतर कुठे जाणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. पुणे पोलिसांना जबाब देण्यासाठी पुण्यात येणार की मसूरीला प्राधान्य देणार, याबाबत उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे. तर वडीलांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब चोहोबाजूने घेतले गेले आहे. परिणामी, पूजा खेडकर आता कोणते पाऊल उचलणार, हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.