aacharya devvrut  Sarkarnama
महाराष्ट्र

Governor appointment: उत्सुकता संपली; सी. पी. राधाकृष्णन यांच्यानंतर राज्यपाल पदाचा चेहरा ठरला? या व्यक्तीकडे असणार अतिरिक्त जबाबदारी

New Governor of State India News : गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे पद रिक्त राहिले होते. आता राज्यपाल म्हणून अखेर नाव समोर आले आहे. गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishn)हे उपराष्ट्रपती झाले आहेत. त्यामुळे गेल्या एकही दिवसापासून महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, अखेर नाव समोर आले आहे, गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

गुजरातचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत हे एक शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत. दरम्यान ते यापूर्वी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील होते. आचार्य देवव्रत हे हिमाचल प्रदेशचे जवळपास चार वर्ष राज्यपाल होते. 2015 पासून ते 2019 पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर राज्यपाल म्हणून गुजरातची जबाबदारी सोपवण्यात आली. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचा देखील पदभार सोपवण्यात आला आहे.

सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे आधीचे राज्यपाल होते. मात्र त्यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत सी.पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले.

सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याबाबत उत्सुकता होती, अखेर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडेच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. ते आता गुजरातसोबतच महाराष्ट्राचीही जबाबदारी सांभाळणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT