Mns News : मनसेकडून तज्ज्ञ वकिलांशी सल्लामसलत, महापालिका निवडणुकीसंदर्भात कोर्टात जाण्याची तयारी ?

MNS municipal elections News : कोर्टाच्या आदेशानंतर आता प्रशासनाने प्रभाग रचना तयार केल्या असून ती प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र अशातच आता मनसेकडून महापालिका निवडणुकीसंदर्भात कोर्टाचे दरवाजे ठोकवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
PMC
PMC Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या साडेतीन ते चार वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या महापालिका निवडणुका आता लवकरच होणार आहेत. त्या संदर्भातील कारवाई ही प्रशासन करून करण्यात येत आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता प्रशासनाने प्रभाग रचना तयार केल्या असून ती प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र अशातच आता मनसेकडून महापालिका निवडणुकीसंदर्भात कोर्टाचे दरवाजे ठोकवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरामध्ये प्रशासनाकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र राज्यभरामधून या प्रभाग रचनेबाबत मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवण्यात येत आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला असून भाजपला (BJP) फायदेशीर ठरेल अशी प्रभाग रचना तयार करण्यात आली असल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहेत.

PMC
Ameet Satam Mumbai BJP President : मुंबई अध्यक्षपदी भाजपचा आक्रमक चेहरा; आमदार साटमांनी पदाची सूत्र स्वीकारताना CM फडणवीसांचा मुंबई जिंकण्याचा विश्वास

विरोधकांबरोबर आता महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) देखील प्रभाग रचना हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला आहे. ही प्रभाग रचना करताना मित्र पक्षांच्या नेत्यांना देखील विचारात घेण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यासोबतच मित्र पक्षातील नेत्यांची देखील प्रभाग आडवे तिडवे तोडले असल्याचा आरोप महायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.

PMC
Shivsen Vs MNS : सेटलमेंट कोण कोणाशी करतंय, हे जनतेला माहिती आहे; सुनील प्रभूंचा राज ठाकरेंवर निशाणा

त्यामुळे प्रभाग रचनेवरून राज्यातील वातावरण तापलं असताना मनसे याबाबत कोर्टाचे दरवाजे ठोकवण्याचा विचारत असल्याचं बोललं जात आहे. मनसे प्रभाग रचनेच्या विरोधात जाणार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञ वकिलांकडून सल्ला घेवून याचिका दाखल केली जाणार आहेत. यासाठी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी काही तज्ज्ञ वकिलांना देखील संपर्क साधला असल्याचं बोललं जात आहे.

PMC
Manoj Jarange VS Devendra Fadnavis : 'फडणवीस शिदेंना काम करू देत नाही, हे सिद्ध झालं', मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा

ज्या पद्धतीने प्रभाग रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या आरोप होत आहेत. तसंच अनेक ठिकाणी नैसर्गिक हद्दीनचा विचार न करता आडवे तिडवे प्रभाग तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.मोठ्या शहरात कसेही प्रभाग बनवण्यात आलेत असं मनसे कडून देखील आरोप करण्यात येत आहे त्यामुळे आता या विरोधात मनसे लवकरच कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे देखील सांगितलं जात आहे.

PMC
Manoj Jarange Patil On CM Fadnavis : फडणवीस साहेब तुम्हाला संधी, तिचं सोनं करा! जरांगे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना शेवटचं आवाहन..

त्यामुळे रखडलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी आणखी काही ट्विस्ट आणि टर्न आगामी काळामध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळे निवडणुका वेळात होणार की आणखी काही कायदेशीर प्रक्रियेमध्ये ही निवडणूक लांबीवर पडणार याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

PMC
Manoj Jarange VS Devendra Fadnavis : 'फडणवीस शिदेंना काम करू देत नाही, हे सिद्ध झालं', मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com