Nitesh Rane  Sarakrnama
महाराष्ट्र

Nitesh Rane : दाऊद मेला की जिवंत हे पण सांगा, गोरंट्याल यांची चौकशी करा: नितेश राणेंनी धरले धारेवर

Sachin Waghmare

Nagpur News : राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. दोन्ही सभागृहात सोमवारी नागपुरात झालेल्या स्फोटासंदर्भात चर्चा होण्याची अपेक्षा असताना सलीम कुत्ता प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत धारेवर धरले.

सलीम कुत्ताची 1998 मध्ये हत्या झाली असल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी आक्रमक होत सलीम कुत्ता हा आरोपी येरवडा कारागृहात असल्याचे सांगत गोरंट्याल जे सांगत आहेत ते सलीम कुत्ता नसून सलीम कुर्ला असल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला.

नितेश राणे यांनी ज्या सलीम कुत्ताचा उल्लेख केला आहे, त्या कुत्ताची 1998 मध्ये हत्या झाली असल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला आहे. ते सोमवारी विधान भवन परिसरात बोलत होते. आमदार नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर सहभागी झाले होते, असा आरोप केला आहे.

या प्रकरणांवर सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी पार्टीसाठी त्यांच्या फार्म हाऊसवर लोकांना बोलावले होते. यामुळे या प्रकरणात ते पूर्णपणे दोषी आहेत. त्यामुळे कारवाई झाली पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात राजकारण होऊ शकत नाही, आरोपीवर कारवाई झाली पाहिजे. आमदार नितेश राणे म्हणाले, सलीम कुत्ता हा आरोपी येरवडा कारागृहात आहे. कैलास गोरंट्याल जे सांगत आहेत तो सलीम कुत्ता नसून सलीम कुर्ला आहे. त्यामुळे गोरंट्याल यांनी दाऊद मेला की जिवंत हे पण सांगावे, याप्रकरणी संबंधित आमदारांची चौकशी करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT