Assembly Winter Session : संत्र्याच्या मुद्द्यावर सत्तार हतबल; म्हणाले ‘काय करावं बाबा काही कळतंच नाही’

Oranges Issue : विरोधकांनी घेरलेल्या सत्तार यांच्या मदतीला अध्यक्ष राहुल नार्वेकर धावून आले.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama

Nagpur News : संत्रा आणि निर्यातीच्या विषयावरील प्रश्नाला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांना अक्षरशः घाम फुटला. निर्यातीचा विषय हा केंद्र सरकारशी निगडित आहे, असे म्हणताच विरोधी बाकावरील विशेषतः विदर्भातील काँग्रेस आमदारांनी सत्तार यांना घेरले.

यशोमती ठाकूर यांच्या आक्रमकपणामुळे सत्तार हतबल झाल्याचे दिसून आले. ‘काय करावं बाबा, काही कळतंच नाही, असे उदगार मंत्री सत्तार यांनी काढले. (Abdul Sattar was once again put on edge by the opposition over the issue of oranges)

नागपुरात चार अद्ययावत निर्यात सुविधा केंद्राची निर्मिती, नागपूर विमानतळावर एअर कार्गो उपलब्ध करून देणे, संत्रा निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदान देणार का, तसेच संत्र्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा उभारणार का, असा सवाल एका आमदाराने केला होता. त्याला उत्तर देताना सत्तार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abdul Sattar
Nagpur Winter Session : अब्दुल सत्तार यांनी विधानसभेतच विरोधकांपुढे हात जोडले....

संत्रा निर्यातीचा प्रश्न हा केंद्र सरकारशी निगडित आहे, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार हे उत्तरात म्हणताच विरोधी बाकाकडून विशेषतः काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि विदर्भातील इतर आमदारांनी आक्षेप घेत उपप्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला.

त्यावर मंत्री सत्तार यांनी ‘ऐका तर खरं,’ अशी विनंती केली. मात्र, ठाकूर आणि इतर आमदार आपले म्हणणे रेटत होते. त्यावर ‘काय करावं बाबा, काही कळतच नाही, असे म्हटले. त्यानंतरही विरोधी आमदार आक्षेप नोंदवत होते.

विरोधकांनी घेरलेल्या सत्तार यांच्या मदतीला अध्यक्ष राहुल नार्वेकर धावून आले.‘मंत्र्यांना बोलू द्यावं. मंत्री उत्तर देत असताना संपूर्ण उत्तर येण्याच्या अगोदरच तुम्ही हरकत घेत आहात, हे काही बरोबर नाही. ही कुठली पद्धत आहे. मंत्र्यांचं संपूर्ण उत्तर होऊ द्या. त्यानंतर तुमची हरकत असेल तर घ्यावी, असे अध्यक्षांनी निर्देश दिले.

Abdul Sattar
Assembly Winter Session : अध्यक्ष महोदय, सरकारकडून तुमचा वारंवार अवमान होतोय; पटोले असे का म्हणाले?

अध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर अब्दुल सत्तार यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, संत्रा निर्यात कंपन्यांशी केंद्र सरकारने करार केलेला असतो, राज्य सरकारचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही, असे सांगताच पुन्हा विरोधकांनी हरकत घेतली. त्यानंतर सत्तार यांनी ‘ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.

आपल्याकडे संत्रा पिकतो. तो विदेशात पाठवतो, निर्यातीला पन्नास टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे, त्यासाठी १६९ कोटी ६० लाख रुपये आपण अनुदान मंजूर केले आहे. त्याव्यतिरिक्त नागपूरमध्ये संत्र्यांच्या संदर्भात व्यवस्था केली जाईल, असेही सत्तार म्हणाले.

Abdul Sattar
Diamond Bourse 5 Reasons : मोदींच्या हस्ते 'डायमंड बोर्सचे' उदघाटन, बोर्स तयार करण्याची 'पाच' मुख्य कारणे

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. संत्रा निर्यातीसाठी आपण निधी मंजूर केला आहे. संत्रा निर्यात कंपन्यांचा केंद्रासोबत करार झाला आहे. त्यात सरकारचा काहीही संबंध नाही. तरीही आपल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना न्याय देण्यासाठी केंद्र आणि कंपन्यांमध्ये समन्वयाचं काम राज्य सरकार करेल, अशी घोषणा सत्तार यांनी केली.

Abdul Sattar
Dawood Ibrahim : दाऊदचा गेम? दोन दिवसांपासून कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com