Nitesh Rane On Jarange: "फडणवीसांवर टीका कराल तर गाठ मराठ्यांशी..."; नितेश राणेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा

Maratha Reservation: जरांगे-पाटलांचे महाराष्ट्रात झंझावाती दौरे सुरु आहेत.
Nitesh Rane and Manoj Jarange-Patil
Nitesh Rane and Manoj Jarange-PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिलेला आहे. सध्या महाराष्ट्रात जरांगे-पाटलांचे झंझावाती दौरे सुरु आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

लातूरमध्ये बोलताना जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. "देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं, नाहीतर मी सगळं बाहेर काढणार", असा थेट इशारा त्यांनी दिला. मात्र, यावरूनच आता भाजप (BJP) आमदार नितेश राणे आक्रमक झाले आहेत. "मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर टीका करू नये, अन्यथा त्यांची गाठ मराठ्यांशी आहे", असा थेट इशारा नितेश राणेंनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitesh Rane and Manoj Jarange-Patil
Maratha Vs OBC: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भुजबळ देणार जरांगेंना प्रतिउत्तर; तेजस्वी यादवांनाही निमंत्रण...

नितेश राणे नेमकं काय म्हणाले ?

"मनोज जरांगे यांना आधीच स्पष्ट केलं होतं की, फडणवीसांवर तुम्ही टीका कराल तर आम्ही ते सहन करणार नाहीत. तुमच्या डोक्यात नेमकं कोण विष टाकतंय ? तुम्हाला भाषणं कोण लिहून देतंय? याची आम्हाला पुराव्यासहित यादी बाहेर काढावी लागेल. तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात बोलत रहाल तर तुमचं स्वागत करू. फडणवीसांनी टिकणारं आरक्षण दिलं होतं. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्याल तर गाठ मराठ्यांशी आहे", असा थेट इशारा राणेंनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दिला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी राज्यातील विविध शहरात जाऊन सभा, मेळावे घेत मराठा आरक्षणासाठी रान उठवलं आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात काय पावलं उचलतं, हे 24 डिसेंबरनंतर कळणार आहेच. मात्र, नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या टीकेला आता मनोज जरांगे पाटील काय उत्तर देतात, हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.

(Edited by-Ganesh Thombare)

Nitesh Rane and Manoj Jarange-Patil
Shivsena Thackeray group: ठाकरेंना धक्यावर धक्के; लातूरमध्ये पक्षाला मोठं खिंडार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com