New Dehli news : दिल्लीत सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या आहेत. त्यातच गेल्या काळी दिवसापासून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या एकही दिवसापासून जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. तर सोमवारी संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. यामुळे दिल्लीतील वातावरण ढवळून निघाले आहे. सोमवारी आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. तर दुसरीकडे अमित शहांसह केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, किरण रिजिजू या दोन बड्या नेत्यांची तब्बल चार तास खलबत पार पडली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कॉकरोच जनता पार्टीने विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. सोमवारी संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. यामुळे दिल्लीतील वातावरण ढवळून निघाले. संसद भवनाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी आश्रुधुराचा वापर केला. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आला. मात्र, त्यानंतरही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ झाली.
त्यातच या सर्व वेगवान घडामोडीमुळं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 3 तास चर्चा झाली. या भेटीत किरण रिजिजूदेखील उपस्थित होते. आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. या तीन प्रमुख नेत्याची जवळपास चार तास बैठक चालली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
दरम्यान, या घडामोडी सुरू असतानाच कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत पक्षाने सरकारसमोर 3 प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामुळे आता या मागण्यांवर केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यामध्ये सोनम वांगचूक यांच्या आंदोलनात अडथळा न आणता त्यांची सुटका करणे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना पदावरून हटवणे आणि NEET परीक्षा प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.