Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Bjp News : फडणवीसांच्या लाडक्या नेत्याचे मोठे विधान; म्हणाले, 'नाराज नाही, पण..'

Political News : पक्षाने जे दिले ते मला मान्य आहे. आता मी धनगर समाजासाठी पूर्णपणे काम करणार आहे, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला असला तरी अद्याप खातेवाटपाची चर्चा आहे. या विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. तर काही बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षांचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची ही मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज असल्याचे समजते.

जत मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतानाच पडळकर यांनी माध्यमासमोर येत मी नाराज नसल्याचे स्पष्ट करीत मंत्रीपद मिळावे, ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचे स्पष्ट केले.

भाजपचा (BJP) मी एक सर्वासामान्य कार्यकर्ता आहे. मला जे सांगितले ते मी करतो. मला मंत्रीपद मिळावे ही कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, मी नाराज नाही. पक्षाने जे दिले ते मला मान्य आहे. आता मी धनगर समाजासाठी पूर्णपणे काम करणार आहे, असेही पडळकर म्हणाले.

धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, असे वाटत होते. पण मी देवाभाऊंच्या सोबत आहे, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले. पक्षाने जे मला दिले आहे, ते मान्य आहे. मारकडवाडीचे आंदोलन भोवल्याचा काही प्रश्न नाही. मंत्रीमंडळ प्रश्न मला काही जास्त महत्त्वाचा वाटत नाही, त्यामुळे मी बोलणार नाही असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

ओबीसी समाजात मोठी नाराजी

माजी मंत्री छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी आहे. पण तो माझ्या पक्षाचा विषय नसल्याचे त्यांनी सांगितले. राम शिंदे यांना जे पद मिळणार आहे, त्याबाबत मी त्यांचे अभिनंदन केले आहे. मी जी भूमिका घेऊन काम करत आहे. ती भूमिका मी अजिबात बदलणार नाही, विधीमंडळात नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT