devendra fadnavis, chandrashekhar bawnkule, chandrakant patil  Sarkarnama
महाराष्ट्र

Bjp News : चंद्रकांत पाटील, बावनकुळेंसाठी CM फडणवीसांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन? स्थानिकच्या निवडणुकीसाठी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र फोकस

Maharashtra local elections News : नगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच भाजपने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची निवड करीत आघाडी घेतली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. नगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच भाजपने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची निवड करीत आघाडी घेतली आहे. जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणुक प्रभारी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागलेले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात त्यामुळे या शहरांच्या प्रमुखांच्या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या नियुक्त्यांमध्ये काही वरिष्ठ नेत्यांना निवडणूक प्रभारी पदापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नेतेमंडळीसाठी CM फडणवीसांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांवर आता भाजपकडून आता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाची जबाबदारी सोपवली जाणार का याकडे लक्ष लागले आहे.

भाजपने (BJP) राज्यभरातील सर्व जिल्ह्यासाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींच्या निवडीची घोषणा बुधवारी करण्यात आली. ही घोषणा करताना भाजपने जुन्या व नव्या नेत्यांचा वाद उफाळून येऊ नये, याची दखल घेतली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागलेले आहे. या नियुक्त्यांमध्ये काही वरिष्ठ नेत्यांना निवडणूक प्रभारी पदापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील या दोघांनाही या जबाबदारीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन नेत्यांकडे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या जबाबदारी देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या शहरांच्या प्रमुखांच्या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या नियुक्त्यांमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना दूर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील काही जिल्ह्यांची जबाबदारी देत असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक प्रभारी पदापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नेतेमंडळीसाठी CM फडणवीसांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असल्याची चर्चा आहे.

येत्या काळात पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर आणि विदर्भाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवली जाईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिल्याने, आता पुण्याचे कारभारी म्हणून मोहोळ यांच्याकडे सोपवण्याची सुरुवात झाली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे.

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चंद्रकात पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट 'निवडणूक प्रभारी' पदावर नसली तरी, पूर्वीच्या काळात प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांची विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये आणि प्रचारात महत्त्वाची भूमिका असणार हे निश्चित आहे. त्यांच्याकडे अनुक्रमे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची संघटन आणि निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपमधील सूत्राने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT