Ajit Pawar Power in Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

Zilla Parishad elections : जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर? प्रचारसभेवेळी अजितदादांचे मोठे विधान; कारणही 'ही' सांगितले

Ajit Pawar statement News : धाराशिव जिल्हयातील नळदुर्ग नगरपालिकेच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी आले होते.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : राज्यात गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आता मुहूर्त लागला आहे. त्यामुळे 2 डिसेंबरला राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचार धुमधडाक्यात सुरु आहे. धाराशिव जिल्हयातील नळदुर्ग नगरपालिकेच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी आले होते.

त्यावेळी त्यांनी आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले. एकीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे या निवडणुकांवर अनिश्चितेच सावट असताना अजितदादांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्यभरात गेल्या काही दिवसापासून नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर, दुसरीकडे जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे या निवडणुकांवर अनिश्चितेच सावट आहेत. जिल्हा परिषदेतील आरक्षणावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये कोर्ट काय निर्णय घेणार यावर निवडणुका कधी होणार हे निश्चित होणार आहे.

त्यातच प्रचार सभेवेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी अजितदादांनी येत्या काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याबाबत कारणही सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीसंबंधी येत्या मंगळवारी सुप्रीम कोर्टात एक सुनावणी आहे. माझ्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता असल्याचे यावेळी बॊलताना अजितदादांनी स्पष्ट केले.

येत्या काळात होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांवर पुन्हा अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT