Congress News : काँग्रेसने ज्या नगरपालिकेत 50 वर्ष सत्ता गाजवली; त्याठिकाणी निवडणुकीत एक उमेदवारही मिळाला नाही

Congress no candidate election News : भोर नगरपालिकेची निवडणूक सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
Congress Adhiveshan
Congress Adhiveshan sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भोर नगरपालिकेची निवडणूक सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होम ग्राउंड तर दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार संग्राम थोपटे यांना स्वतःला सिद्ध करण्याची लढाई बनलेला या संग्रमात काँग्रेसचे मात्र अस्तित्व दिसून येत नाही.

भोर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपविरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होताना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) देखील या निवडणुकीत उडी घेतली होती. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पळवून त्याला पक्षप्रवेश दिला.

Congress Adhiveshan
BJP Strategy : नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या अर्ध्या उमेदवारांच्या हातात कमळ, भाजपची खेळी ठाकरे व पवारांनाही उमगली नाही

त्यानंतर प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आणि अजित पवारांची सत्ता असली तरी मुख्यमंत्री मात्र देवेंद्र फडणवीस आहेत. हे लक्षात ठेवूनच भोरच्या जनतेने मुख्यमंत्र्यांना मतदान करावे, असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले. त्याला अजित पवारांच्या आमदारांकडून उत्तर देखील आले.

Congress Adhiveshan
NCP SP Politics : शरद पवारांच्या पक्षाकडून अजित पवारांचे नाव घेत कोट्यावधींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप

अजित पवारांचे (Ajit Pawar) स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी मुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस असले तरी पालकमंत्री हे अजित पवार आहेत. जोपर्यंत अजित पवारांच्या सहीने खालून प्रस्ताव जात नाही. तोपर्यंत मुख्यमंत्री सहीच करू शकत नाही. त्याचे भान ठेवून मतदारांनी मतदान करावे, असे मांडेकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या अवाहनाला उत्तर दिले आहे.

Congress Adhiveshan
Congress Political Crisis: बिहारमध्ये धुव्वा उडाल्यानंतर काँग्रेस समोर मोठं संकट, इंडिया आघाडीत फूट? 'हे' पक्ष बाहेर पडणार

मात्र, ज्या मैदानावरती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाच्या लढाईसाठी उतरले आहेत. ते मैदान गेल्या पन्नास वर्षापासून काँग्रेसचे अभेद गड म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला 30 वर्ष माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले अनंतराव थोपटे यांनी भोर परिसरात काँग्रेसचा किल्ला मजबूत केला होता. त्यानंतर वीस वर्ष तो किल्ला आणखीन बळकट करण्याचे काम माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

Congress Adhiveshan
BJP Shinde tensions: दिल्लीहून परतल्यानंतर नाराज एकनाथ शिंदेंची भाजपवर पहिल्यांदा टीका; पालघरमध्ये म्हणाले, 'अहंकाराविरोधात एकत्र....'

त्यामुळे भोर आणि काँग्रेस असे एक समीकरणच बनले होते. मग ती विधानसभेची निवडणूक असू स्थानिक स्वराज्याची अथवा लोकसभेची भोरमधून काँग्रेसच्याच उमेदवाराला लीड मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात असे मात्र मागील काही महिन्यांपूर्वी माजी आमदार असलेल्या संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि त्यांच्यासोबत सर्वच काँग्रेस भाजपमय झाली आहे.

Congress Adhiveshan
Congress Political Crisis: बिहारमध्ये धुव्वा उडाल्यानंतर काँग्रेस समोर मोठं संकट, इंडिया आघाडीत फूट? 'हे' पक्ष बाहेर पडणार

थोपटे भाजपमध्ये गेल्याने पोरक्या झालेल्या भोरमधील काँग्रेसला नगरपालिकेच्या निवडणुकीत एक उमेदवार ही देता आला नाही, ही शोकांतिका असल्याचे जुने काँग्रेसजण सांगतात. याठिकाणी जी काँग्रेस होती ती थोपटे काँग्रेस होती. आता ती थोपटे काँग्रेस आता भाजप झाली आहे. मात्र भोरमधील काँग्रेस संकटात असताना वरिष्ठ पातळीवरून कोणतीही दखल देखील घेतली गेली नाही. त्यामुळे 50 वर्ष ज्या नगरपालिकेत काँग्रेसने सत्ता गाजवली. त्या नगरपालिकेत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढणारा एक उमेदवार ही मिळालेला नाही. याकडे काँग्रेस लक्ष देणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Congress Adhiveshan
Sangram Thopte: भाजप प्रवेशाचं संग्राम थोपटेंना मिळणार मोठे गिफ्ट; मालामाल होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com