Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या नातीच्या छेडछाड प्रकरणी मोठी अपडेट; देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis reaction News : छेडछाड प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुक्ताईनगर येथील जत्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह आणखी काही मुलींची छेडछाड केल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून या छेडछाड प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. या प्रकरणी एकूण 6 टावळखोरांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या (Raksha Khadse) मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान ही घटना घडली. दरम्यान याबद्दल पोलिसांकडे तक्रार केली असता छेडछाड प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. या प्रकरणी एकूण सहा टावळखोरांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. अन्य आरोपींचा पॊलिसांकडून शोध घेतला जात आहे.

दरम्यान, आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींना माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच आहे. खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्र्याच्या मुलीबाबत छेडछाडीचा प्रकार होत असेल तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी गृहमंत्र्यांना केला आहे. रक्षा खडसे यांची मुलगी आणि माझी भाचीची छेडछाडी करण्याच्या प्रकरणाला दोन दिवस उलटूनही पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करतेय, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड काढली. मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी रक्षा खडसे यांनी आक्रमक पावित्रा घेत तक्रार दाखल केली. यानंतर रक्षा खडसे यांनी नेमकं काय घडलं, याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एकूण सहा टावळखोरांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पोलीस या प्रकरणातील टावळखोरांचा शोध घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT