Sharad Pawar MLA : टोकाची टीका केल्यानंतर शरद पवारांच्या आमदाराचा अजितदादांसोबत एकाच गाडीने प्रवास; मोठी खलबतं ?

Ajit Pawar News : यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीसाठी नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ajit Pawar Shard Pawar
Ajit Pawar Shard PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यात शनिवारी एका महत्त्वाच्या बैठकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या भेटीसाठी नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते व माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत प्रवास केला. प्रवासादरम्यान दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शनिवारी विधान भवन येथे कालवा समितीची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी जानकर यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी अजित पवार आणि उत्तमराव जानकरांचा एकाच गाडीने प्रवास केला. त्यांनी पुण्यातील सर्किट हाऊसपासून विधान भवनापर्यंत एकत्र प्रवास केला. बैठक सुरू होण्यापूर्वी दोघामध्ये सविस्तर चर्चा झाली, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. एकाच गाडीत दोघांनी प्रवास केले असल्यामुळे येत्या काळात काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ajit Pawar Shard Pawar
Shivsena Politics : "फडफडणं तात्पुरतं, तुम्हाला मातोश्रीच्या दारात यावंच लागेल..." राऊतांचं शिंदेंच्या शिलेदाराबाबत मोठं भाकीत

पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीसाठी जानकर यांनी अजित पवारांसोबत विधान भवन येथे हजेरी लावली. मात्र, याच बैठकीसाठी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राम सातपुतेदेखील उपमुख्यमंत्री पवारांची भेट घेण्यासाठी उपस्थित होते. या बैठकीला अनेक नेते उपस्थित होते.

Ajit Pawar Shard Pawar
Shivsena UBT News : शिंदेंच्या मंत्र्याच्या पंगतीत गेलेले 'ते' खासदार उद्धव ठाकरेंच्या दरबारात हजर!

पश्चिम महाराष्ट्रातील कालवा व्यवस्थापन हा या बैठकीतील मुख्य मुद्दा आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणाचे आवर्तन 15 दिवस आधी सोडण्याची गरज आहे, यावर चर्चा झाली. या संदर्भात उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना देत या भेटीमागे काहीच राजकीय संकेत नसल्याचे यामधून स्पष्ट करण्यात आले.

Ajit Pawar Shard Pawar
Shivsena UBT News : शिंदेसेनेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला विरोधी पक्षनेते पदही मिळू द्यायचे नाहीये!

उत्तमराव जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे आमदार असून, त्यांनी ईव्हीएम विरोधात लढा सुरू ठेवला होता. त्यामुळे त्यांची ओळख संपूर्ण राज्यभर झाली आहे. कालवा संदर्भातील या महत्त्वाच्या बैठकीस आमदार जानकर यांच्या शिवाय रामराजे निंबाळकर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि अन्य वरिष्ठ नेते थेट विधान भवनात दाखल झाले होते.

Ajit Pawar Shard Pawar
Ajit Pawar : आरोपी सापडत नाही म्हणून स्वतःच्या घराच्या काचा फोडणार का? अजितदादांचा वसंत मोरेंना सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com