Shivsena UBT News : शिंदेंच्या मंत्र्याच्या पंगतीत गेलेले 'ते' खासदार उद्धव ठाकरेंच्या दरबारात हजर!

Uddhav Thackeray convened a meeting with MPs at Matoshree, where Jadhav and Ashtikar were present, discussing important political matters. : परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्याभोवती गेल्या काही दिवसापासून संशयाचे जाळे निर्माण झाले होते.
Shivsena UBT MP Met Uddhav Thackeray News
Shivsena UBT MP Met Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या मिशन टायगरची चर्चा सध्या थंडावली आहे. कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा धक्का दिल्यानंतर थोडा ब्रेक घेण्यात आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे संसदीय अधिवेशनाच्या काळात दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या पंगतीत जेवून आल्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले मराठवाड्यातील 'ते' दोन खासदार आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या दरबारात हजर होते.

परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्याभोवती गेल्या काही दिवसापासून संशयाचे जाळे निर्माण झाले होते. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान, शिंदे गटाच्या मिशन टायगरची चर्चा जोरात सुरू होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात जाणार, अशा चर्चांना तेव्हा उधाण आले होते.

या चर्चा फोल ठरवण्यासाठी ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी दिल्लीत सगळ्या खासदारांना एकत्र घेत वज्रमूठ दाखवली होती. यावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही वज्रमूठ किती दिवस टिकते हे पहा, असे म्हणत आव्हान दिले होते. (Shiv Sena) दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या बंगल्यावर सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. अर्थात ठाकरेंच्या पक्षातील खासदारांनाही याचे निमंत्रण देण्यात आले होते.

Shivsena UBT MP Met Uddhav Thackeray News
Shivsena UBT : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेच असावे..., आमदारांसह नेत्यांचा सूर; भास्कर जाधवांच्या नावाला मात्र विरोध?

परंतू गद्दारी करून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांच्या पंगतीत बसायचे का? या विचाराने अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली होती. पंरतु मराठवाड्यातील परभणीचे संजय जाधव आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर जाधवांच्या स्नेह भोजनाला गेले होते. यावेळी माध्यमांनी जाधव यांना विचारले तेव्हा, कोणी जेवायला बोलावले तर जायचे नाही का? मिशन टागर वगैरे फेल आहे, असा दावा करत संताप व्यक्त केला होता.

Shivsena UBT MP Met Uddhav Thackeray News
MP Sanjay Jadhav News : दिल्लीत शिंदेंच्या मंत्र्याच्या पंगतीत जेवले, तरी परभणीकरांना 'बंडू बॉस'वर विश्वास!

तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही दिल्लीत सत्ताधारी मंत्री किंवा खासदारांच्या कार्यक्रमात परवानगी शिवाय सहभागी होऊ नका, अशा सूचना दिल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार जाधव आणि आष्टीकर यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा राज्यात आणि त्यांच्या मतदारसंघातही सुरू झाल्या होत्या. अर्थात या दोघांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्या थांबल्या नव्हत्या. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक आज मुंबईत बोलावली होती.

Shivsena UBT MP Met Uddhav Thackeray News
Shivsena UBT News : खासदार जाधव, आष्टीकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चेला तूर्तास विराम!

मंत्री प्रताप जाधव यांच्या पंगतीत जेवून आलेले खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर मातोश्रीवरील बैठकीला जातात की नाही? अशा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र हे दोघेही उद्धव ठाकरेंच्या दरबारात हजर होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची या बैठकीला उपस्थिती होती. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य छायाचित्रासमोरच सगळ्या खासदारांनी पुन्हा एकजुटीची वज्रमूठ आवळल्याचे दिसले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com