Eknath Khadse & Girish Mahajan Sarkarnama
महाराष्ट्र

Khadse vs Girish Mahajan : खडसेंचे पुन्हा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप; म्हणाले, 'कोट्यवधीची मालमत्ता...'

Political News : खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाजन नेहमीच माझ्याबाबत फेकाफेकी करत असतात.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे अन् राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात गेल्या काही दिवसापासून आडवा विस्तवही जात नाही. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता पुन्हा एकदा खडसे यांनी महाजनांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्याबाबत वारंवार फेकाफेकी करत असणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कुठून व कशी आली? असा सवाल करीत खडसे यांनी धारेवर धरले आहे.

खडसे यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता महाजन यांच्याकडे कुठून आली? महाजन हे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते? असा सवाल त्यांनी केला आहे. महाजन यांचे वडील शिक्षक होते. त्यामुळे शिक्षकाच्या मुलाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कुठून आली ? मी सात वर्षांचा होतो तेव्हापासूनच माझ्या नावावर शंभर एकर जमीन आहे, असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

खडसे यांनी काय केले हे गंभीर आरोप?

खडसे (Eknath khadse) यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाजन नेहमीच माझ्याबाबत फेकाफेकी करत असतात. मागच्या वेळेसही गिरीश महाजन म्हणत होते की, कोथळीची ग्रामपंचायत खडसेंची नाही म्हणून, पण त्यांना सांगायचं आहे की गेल्या 37 वर्षांपासून कोथळीची ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे, त्यामुळे महाजन यांच्याकडून केल्या जात असलेल्या आरोपामध्ये काहीच तथ्य नाही.

दुसरीकडे मंदाकिनी खडसे या जेलमध्ये जाणार होत्या, पण मी त्यांना वाचवले असेही गिरीश महाजन सांगत असतात. मला जामीन मिळाला तो सुप्रीम कोर्टातून मिळाला, मग महाजन एवढे का फेकत आहेत? असा टोला यावेळी खडसे यांनी लगावला. मला आणि माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले, असा आरोपही यावेळी खडसे यांनी केला आहे.

इंदूर- हैदराबाद महामार्ग प्रकल्पामध्ये खडसेंची जमीन जाणार आहे, यावर प्रतिक्रिया देताना खडसेंनी जमीन आताच घेतली, मोबदला मिळावा यासाठी ही जमीन घेतली, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता, या आरोपांना उत्तर देताना खडसे म्हणाले, 'मंत्री असताना महाजन यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. धरणात जमीन जाणार असल्याचे सांगत गिरीश महाजन यांनी जमीन विकत घेऊन 15 कोटी रुपये हडप केले असल्याचा आरोपही खडसे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT