Eknath Shinde : शिंदे सेनेतील बड्या नेत्याचा वाद चव्हाटयावर; थेट संपर्क नेत्याचाच पुतळा जाळला

Shinde Sena dispute News : जिल्हा प्रमुखाच्या समर्थकांनी संपर्क नेत्याचा पुतळा जाऊन आपला निषेध केल्याने स्थानिक निवडणुकीत शिवसेनेला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

AKola News : अकोला जिल्ह्यात शिंदे सेनेतील वाद आणि भांडणे विकोपाला गेली आहेत. जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर आणि संपर्क नेते माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांचे समर्थक आपसात भिडले आहेत. जिल्हा प्रमुखाच्या समर्थकांनी संपर्क नेत्याचा पुतळा जाऊन आपला निषेध केल्याने स्थानिक निवडणुकीत शिवसेनेला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उद्धव आणि शिंदे सेना वेगवेगळ्या झाल्यानंतर अकोल्यात कोणता झेंडा हाती घ्यायचा यावरून मोठा पेच निर्माण झाला होता. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने अनेकांनी शिंदे सेनेला पसंती दर्शवली. मात्र, आपसातील वादविवाद, मतभेदांमुळे पुन्हा कोणासोबत राहायचे असा प्रश्न स्थानिक शिवसैनिकांना पडला आहे. बाजोरिया आमदार होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी त्यांना विधान परिषदेत पाठवले होते. त्यामुळे त्यांचे अकोला परिसरात चांगलेच वजन आहे. शिंदे सेनेने अकोलाच्या संपर्क प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.

Eknath Shinde
Vaishnavi Hagawane Death: वैष्णवी हगवणेची आत्महत्या नसून हत्या, वडिलांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

दुसरीकडे पिंजरकर जिल्हा प्रमुख आहेत. संपर्क प्रमुख जिल्ह्याच्या कारभारात ढवळाढवळ करतात असा त्यांचा आरोप आहे. यातून पडलेल्या वादाची ठिगणी आता चांगलीच पेटली आहे. दोन्ही गटातून विस्तव जात नाही अशी परिस्थिती आहे. अलीकडेच झालेल्या पक्षाच्या बैठकीत हे वाद पुन्हा उफाळून आले. पिंजरकर वन मॅन आर्मी असल्याचा आरोप बाजोरियाच्या समर्थकांनी केला होता. त्यामुळे पिंजरकरांचे समर्थक चांगलेच संतापले. त्यांनी बाजोरियांचा पुतळा जाऊन निषेध व्यक्त केला. अशा परिस्थितीत अकोला महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे कसे जायचे असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

Eknath Shinde
Vaishnavi Hagawane Case: राष्ट्रवादीच्या नेत्याचं दुसरं कांडही समोर; मोठ्या सुनेचाही छळ; कपडे फाटेपर्यंत अमानुष मारहाण? धक्कादायक माहिती समोर

अकोला जिल्ह्यात भाजप (Bjp) आणि काँग्रेसचे प्राबल्य आहे. ग्रामीण भागात प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वर्ग आहे. याचा फायदा जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीला होत असतो. लोकसभेच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता.

Eknath Shinde
Sushma Andhare on Shirsat : सिद्धांत शिरसाटच्या विरोधातील तक्रार मागे घेताच सुषमा अंधारे आक्रमक; संजय शिरसाटांची कार्यपद्धतीच काढली

बाळासाहेब ठाकरे असताना अकोला व अमरावती या जिल्ह्यात शिवसेनेचा चांगलाच जोर होता. मात्र गटबाजी व आपसातील भांडणामुळे तो आता नावालाच उरला आहे. स्थानिक निवडणुकीच्या माध्यमातून शिंदे सेनेला अकोल्यात आपले अस्तित्व निर्माण करण्याची संधी आहे. मात्र त्यापूर्वीच पदाधिकाऱ्यांची एकमेकांच्या विरोधात शस्त्र उपसले आहे. याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Eknath Shinde
Amit Shah political plan: आमित शाहांचा कानमंत्र; डाव पलटणार, भाजप आमदार करणार सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com