Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच ठरलं! 'या' नेत्यावर दिली मोठी जबाबदारी

Eknath Shinde Appoints chief Whip Ramesh Bornare : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांमध्ये रमेश बोरनारे यांचा देखील समावेश होता.

Roshan More

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्या मोठी जबाबदारी दिली आहे. शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी बोरनारे यांचची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे बोरनारे जो व्हीप जारी करतील तो शिवसेनेच्या सर्वच आमदारांना पाळावा लागणार आहे. विशेष म्हणजे जबाबदारी मिळताच त्यांनी पहिला व्हिप जारी देखील केली.

शिवसेनेच्या प्रतोद पदी निवड झालेले रमेश बोरनात हे वैजापूर विधानसबा मतदारसंघाचे आमदार आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांमध्ये बोरनारे यांचा देखील समावेश होता.

आज (सोमवार) विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे रमेश बोरनारे यांनी व्हीप जारी करत शिवसेनेच्या 57 आमदारांना विधानसभेच्या सभागृहात विश्वास दर्शक ठरावाला पाठींबा देण्यास सांगितले आहे.

व्हिपमध्ये नेमकं काय?

रमेश बोरनारे यांनी जारी केलेल्या व्हिपमध्ये म्हटले आहे की, अधिवेशादरम्यान 9 डिसेंबर 2024 ला सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव आहे. शिवसेना पक्षाच्या विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहून विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश आहे.

भरत गोगावलेंना मंत्रिपद?

गेल्या विधानसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदाची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे होती. मात्र, यावेळी भरत गोगावले यांना प्रतोद पदाची जबाबदारी न देता रमेश बोरनारे यांची प्रतोद पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भरत गोगावले यांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे त्यांना प्रतोद पद दिले नसल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT