Aamshya Padavi Video : एकनाथ शिंदेंचा आमदार शपथ घेताना गोंधळला, वाचताही येईना?

Aamshya Padavi MLA oath Shivsena : आमश्या पाडवी म्हणाले, माझ्या घरातला मी पहिला व्यक्ती आहे जो चौथीपर्यंत शिक्षण घेतल. तरीही मी सरपंच झालो, पंचायत समीतीचा सभापती झालो आणि दोन वेळा आमदार देखील झालो.
Aamshya Padavi
Aamshya Padavisarkarnama
Published on
Updated on

Aamshya Padavi Video : विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी पार पडले. शनिवारी (ता.7) सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शपथ घेतली. आज (रविवारी) देखील आमदार शपथ घेत होते. मात्र, या शपथ घेत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी गोंधळलेले पाहण्यास मिळाले. शपथविधीनंतर स्वतः आमश्या पाडवी यांनीच आपल्याला वाचता येत नाही त्यामुळे गोंधळ झाल्याचे सांगितले.

पाडवी यांच्या शपथविधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाडवी यांनी सांगितले की वाक्य जास्त लांब असल्याने अडचण आली. माझं शिक्षण कमी आहे. माझ्या घरातला मी पहिला व्यक्ती आहे जो चौथीपर्यंत शिक्षण घेतल. तरीही मी सरपंच झालो, पंचायत समीतीचा सभापती झालो आणि दोन वेळा आमदार देखील झालो. कारण मी लोकांमध्ये राहणारा एक व्यक्ती आहे. त्यामुळे लोकांनी मला निवडून दिलं आहे.

कुटुंब उपस्थितीत

आमश्या पाडवी यांच्या शपथविधीसाठी त्यांचा परिवार उपस्थित होता. त्याबाबत बोलताना पाडवी म्हणाले, मी परिवारासह शपथविधीसाठी आलो होतो. विधान परिषदेचा जेव्हा आमदार झालो होतो तेव्हा माझा परिवार उपस्थित नव्हता. माझी इच्छा होती की मी विधानपरिषदेचा सदस्य असताना मी विधानसभेच्या निवडणुकीत निवडून यायला पाहिजे आणि निवडून देखील आलो. आज आमदारकीची शपथ घेताना सर्व परिवार बरोबर आहे याचा आनंद आहे.

आमश्या पाडवींची राजकीय कारकिर्द

काँग्रेसचे उमेदवार के सी पाडवी यांचा आमश्या पाडवी यांनी पराभव केला. अक्कलकुवा तालुक्यातील अंकुशविहीर गावच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते 21 वर्षे अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य होते.पंचायत समितीचे सभापतिपद देखील त्यांनी भूषवले. 2014 मध्ये आमश्या पाडवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेतील फूटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत होते. मात्र, नंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. त्यानंतर ते विधान परिषदेचे आमदार देखील झाले. 2019 ला काँग्रेसचे उमेदवार के सी पाडवी यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत केसी पाडवींचा पराभव केला.

Aamshya Padavi
MNS News : मनसेच्या बड्या नेत्याची रामदास आठवलेंवर जहरी टीका; म्हणाले, ‘काचेच्या घरात आहोत…’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com