Nanded News: महाराष्ट्राचं राजकारणात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. फोडाफोडी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे इनकमिंग आणि आऊटगोईंगच्या वारंवारच्या धक्क्यांमुळे विरोधी पक्षही ढासळताना दिसतंय. भाजपकडून आक्रमकपणे राज्यात जोरदारपणे 'ऑपरेशन लोटस' राबवलं जात आहे. पण दुसरीकडे एकनाथ शिंदेंही लवकरच मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देतानाच शिवसेनेच्या महिला नेत्यानं नवा राजकीय बॉम्ब टाकला आहे.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी शनिवारी(ता.27) नांदेड येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय घडामोडींवरही मोठं भाष्य केलं. त्यांनी राज्यात ऑपरेशन टायगर' किंवा 'ऑपरेशन तुतारी' होणार, पण जे होणार ते योग्यवेळी होणार असल्याचं सांगत मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. या त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ज्योती वाघमारे म्हणाल्या, राज्याच्या राजकारणात काहीतरी होणार आहे. मोठा भूकंप होणार आहे. राजकारणात परफेक्ट टाईमला खूप महत्त्व असतं. तेव्हा योग्य वेळ आल्यानंतर नक्की सांगू", असं सूचक विधान करत खासदार ज्योती वाघमारे यांनी नांदेडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची धडधड वाढवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
'ऑपरेशन टायगर' अंतर्गत उद्धव ठाकरेंचे आणखी काही खासदार पक्षाला 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या पक्ष सोडण्यामागं ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत असंतोष, राज्यसभेच्या जागेवरून पेटलेला वाद आणि आदित्य ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरील खासदारांची नाराजी ही मुख्य कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात लवकरच फूट पडणार असल्याचा दावा केला आहे. बैठकीत खासदारांनी आदित्य ठाकरे पुरेसा वेळ देत नसल्याची आणि पक्षनेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचं समोर येत आहे.
तसेच खासदारांची उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाल्यानंतर हे ऑपरेशन तूर्तास स्थगित झाल्याचंही बोललं जात आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी खासदारांना लढायचे नसेल तर थांबतो असा इशारा दिल्याचंही सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.