Jyoti Waghmare Rajya Sabha nomination : एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच उलगडले राज्यसभेच्या उमेदवारीचे रहस्य; म्हणाले, 'कागदपत्रे घेतली....'

Eknath Shinde decision News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने धक्कातंत्राचा अवलंब करीत पक्षाच्या प्रवक्त्या व आक्रमक नेत्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी दिली आहे. त्यांची ही उमेदवारी त्यांच्या पक्षातील इच्छुक असलेल्या नेतेमंडळींसह इतरांसाठी मोठा धक्काच ठरली आहे.
Eknath Shinde Jyoti Waghmare .jpg
Eknath Shinde Jyoti Waghmare .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील येत्या काळात रिक्त होत असलेल्या सात जागांसाठी सात जणांचे उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १६ मार्चला होणार आहे. या सात जागेपैकी सहा जागांवर महायुतीचे वर्चस्व आहे. त्यामध्ये भाजपच्या वाट्याला 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या पक्षाला एक जागा मिळाली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने धक्कातंत्राचा अवलंब करीत पक्षाच्या प्रवक्त्या व आक्रमक नेत्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी दिली आहे. त्यांची ही उमेदवारी त्यांच्या पक्षातील इच्छुक असलेल्या नेतेमंडळींसह इतरांसाठी मोठा धक्काच ठरली आहे. याबाबत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले आहेत. त्यांनी ज्योती वाघमारे यांना उमदेवारी देताना काय सांगून कागदपत्रे घेतली याचे गुपित उलगडले आहे.

राज्यसभेच्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे (Shivsena) असलेल्या या एकमेव जागेसाठी दिग्गज मंडळींची रस्सीखेच होती. माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव चर्चेत होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी फायनलही मानले जात होते. त्यातच वाघमारे यांना उमेदवारी दिल्याने माजी मंत्री गजानन कीर्तिकर, संजय निरुपम, आनंदराव अडसूळ, शायना एनसी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्याकडून कागदपत्रे कमिटी स्थापन करण्यासाठी हवी आहेत, असे सांगून आम्ही डाक्युमेंट घेतली होती. त्यानंतर आम्ही अर्ज दाखल करण्यापूर्वी राज्यसभेसाठी आपण तुमचा अर्ज भरणार आहोत, असे सांगत त्यांना देखील आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य महिलांना स्थान दिले आहे. प्रत्येक कार्यकर्त्यावर आमचे लक्ष असते असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde Jyoti Waghmare .jpg
BJP Politic's : भाजपचे 7 पंचायत समितीत सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे; 'या' नेत्यांवर गटनेत्याची जबाबदारी!

त्यासोबतच यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, 'बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या आहेत. त्यांनी विविध फुड ट्रक सुरु केले. सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही माझी मोठी ओळख असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. माझी आई वारली ही बातमी समजली त्यानंतरही मी राजेंद्र गावित यांच्या भागात पाच ते सहा सभा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Eknath Shinde Jyoti Waghmare .jpg
Shivsena Rajya Sabha: शिंदेंकडून वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी; इच्छुक नेता भडकला; म्हणाले...

या कार्यक्रमाला माझ्या वडीलांची तब्येत बरी नाही म्हणून मी येणार नव्हतो, पण हा लाडका भाऊ बहिणीच्या प्रेमापासून वंचित रहायला नको म्हणून मी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. निवडणुकीत आपण वार नाही तलवार आहे, ही शमशेरीची धार आहे हे सगळ्यांना दाखवले. मी आईची तगमग आणि बायकोची काटकसर बघितली म्हणून लाडकी बहिण योजना सुरू केली. तर दुसरीकडे ज्योती वाघमारे या लाडक्या बहिणीला खासदार केले. सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही माझी मोठी ओळख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी सांगितले.

Eknath Shinde Jyoti Waghmare .jpg
NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरूच, सुनिल तटकरेंवर नाराजी, राजीनामापत्रात नेमकं काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com