Dhananjay Munde : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येणार की नाही? या प्रश्नावर भुजबळांची गुगली; म्हणाले, 'हे सांगण्यासाठी मी काय खरात आहे का?'

Ashok Kharat case News : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सत्ताधारी व विरोधकांकडून अशोक खरात यांच्यासॊबत फोटो असल्यावर टीका केली जात आहे.
Dhananjay Munde-Chhagan Bhujbal
Dhananjay Munde-Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्याने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. रोज बाहेर येत असेलल्या प्रकरणाने राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भुजबळांनी प्रश्न विचारण्याचीच फिरकी घेत हे सांगायला मी काही खरात नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सत्ताधारी व विरोधकांकडून अशोक खरात यांच्यासॊबत फोटो असल्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या प्रकरणावरही भाष्य केले आहे.

Dhananjay Munde-Chhagan Bhujbal
Raj Thackeray news : भोंदूबाबा खरात प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, माझ्या तर कानावर असं येतंय की, कोणाच्या तरी...

मंत्रिमंडळाचा येत्या काळात विस्तार होणार असून त्यामध्ये धनंजय मुंडे यांची वर्णी लागणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. धनंजया मुंडे यांना बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड आणि इतर आरोपींवर देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. त्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ते पुन्हा मंत्रिमंडळात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.

Dhananjay Munde-Chhagan Bhujbal
Ramdas Athawale: "आपण कोणत्याही भोंदू बाबाकडे न जाताच..."; रामदास आठवलेंचा नेमका कोणावर निशाणा?

धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाबाबत छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, ‘कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे हा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. मंत्रिमंडळ पूर्ण नसले तरीही सरकार चालते. आमच्या पक्षातून कोण मंत्री असेल हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ठरवतात. एक दोन मंत्री नसतील तरी सरकार चालते. धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा येणार की नाही ? हे सांगायला मी काही खरात नाही, असे म्हणत त्यांनी चिमटा काढला.

Dhananjay Munde-Chhagan Bhujbal
Ashok kharat controversy : 'अशोक खरातमुळेच एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले...', ठाकरेंच्या नेत्याने सांगितलं केसरकर कनेक्शन

त्यासोबतच यावेळी भुजबळ म्हणाले, 'नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा सर्व प्रकार दुर्दैवी आहे. नाशिकमध्ये या गोष्टी घडतात मला याच अत्यंत दुःख वाटत आहे. अजून आपले लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या गोष्टी कधी ना कधी बाहेर येतातच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले आहे.

Dhananjay Munde-Chhagan Bhujbal
Sanjay Raut : "भोंदूबाबा अशोक खरात हा भाजपचा अधिकृत प्रचारक होता..."

’ खरातकडे कधी मी गेलो नाही : भुजबळ या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव आले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. ज्या माणसाला स्वतःच भविष्य कळले नाही तो काय दुसर्‍याच भविष्य पाहणार? सगळेच नेते सारखे नसतात. एखाद-दुसरी चूक माफ केली जाते, असेही त्यांनी सांगितले. तुम्ही कधी खरात कडे गेले होते का? यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘खरातच नाव मी ऐकले होत पण मी कधी त्याच्याकडे गेलो नाही.'

Dhananjay Munde-Chhagan Bhujbal
Jitendra Awhad : अशोक खरातकडे निघालो होतो! पुढे काय घडलं? आव्हाड म्हणाले, 'नशीब हा खान...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com