Eknath Shinde  sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : सततच्या दिल्लीवारी अन् नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचे मोठे भाष्य; म्हणाले, 'मोदी- शहा भेटीसाठी..'

delhi visits controversy News : एकीकडे सीएम फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सततच्या 'दिल्ली'वारीचे रहस्य उघड केले असताना आता दुसरीकडे सततच्या दिल्लीवारी अन् नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी मोठे भाष्य केले.

सरकारनामा ब्युरो

Nagpur News : राज्यातील राजकारणात गेल्या चार वर्षाच्या काळात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याने दोन गट पडले. त्यातच वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाला आहे. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुलाखत एका न्यूज चॅनलने घेतली. त्यामध्ये त्यांनी विविध विषयावर दिलखुलासपणे चर्चा केली. एकीकडे सीएम फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सततच्या 'दिल्ली'वारीचे रहस्य उघड केले असताना आता दुसरीकडे सततच्या दिल्लीवारी अन् नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी मोठे भाष्य केले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आगामी काळात होत असलेल्या राज्यातील महापालिका निवडणूकांसाठी महायुतीची रणनीती, अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात केलेल्या विकास कामांना उजाळा दिला, त्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच मविआवर त्यांनी बोचरी टीका केली.

आगामी काळात होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत झालेल्या प्रकारामुळे मी कधीच नाराज नव्हतो. त्यावेळी एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेतले जात होते. याबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोललो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यात यापुढे एकमेकांचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घ्यायचे नाहीत, असे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय येत्या काळात सर्वच निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सततच्या दिल्ली दौऱ्याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, 'मी दिल्लीला येथील प्रश्न घेवून जातो का? मी एनडीएचा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मोदी- शहा मला बोलवत असतात. त्यावेळी बिहार सरकारचा शपथविधी होता. त्याचे निमंत्रण आपल्याला होते. त्यासाठी दिल्लीला गेलो होतो. दिल्ली भेटीबाबत प्रश्न ही तुमचेच आणि उत्तर ही तुमची. फक्त पतंग उडवायचे असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

भाजप (BJP) आणि आपल्यात कोणताही तणाव नव्हता, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ते एकमेकां समोर उभे राहीले होते. आम्ही ठरवलं होतं काही ठिकाणी युती करायची. पण काही ठिकाणी आम्ही वेगळे लढलो. मी कधी ही कोणावर नाराजी दर्शवली नाही. माझी नाराजी नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांना त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबतही विचारण्यात आले. त्याला ही त्यांनी उत्तर दिले.

आगामी काळात होत असलेल्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. आम्ही धडाधड काम करत असतो. निवडणुकांची चिंता आम्हाला नाही. लोक सुज्ञ आहेत. त्यांना माहित आहे काम करणारे कोण आणि घरी बसणारे कोण? त्यांनी ठाकरेंना यावेळी टोला लगावण्याची संधी सोडली नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी बोलताना शिंदे म्हणाले, 'कुणाच्या आघाडी युतीची आम्हाला काळजी नाही. पण लोकं- मतदार हे सुज्ञ आहेत. लोकांसमोर आमचे काम आहे. त्यामुळे महायुती महापालिका निवडणूका जिंकणार.आमचा ब्रँड कायम आहे. आम्ही कामाला महत्व देतो. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना लोकांनी निवडणुकीत जागा दाखवली, अशी टीकाही शिंदे यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT