Tanaji Sawant controversy : तानाजी सावंतांना एकनाथ शिंदेंच्या ताकदीवर भरोसा नाही? लेकाला भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी लावली ताकद

BJP candidature politics News : भाजपकडून गेले दोन दिवस उमेदवारी अर्ज वाटप करण्यात येत आहे. अर्ज घेण्यासाठी भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे.
Devendra fadanvis, Eknath Shinde, Tanaji Sawant
Devendra fadanvis, Eknath Shinde, Tanaji Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच्या सर्व 165 जागांवर भाजप उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरून देण्याची आवाहन भाजपने केले आहे. त्यासाठी भाजपकडून गेले दोन दिवस उमेदवारी अर्ज वाटप करण्यात येत आहे. अर्ज घेण्यासाठी भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे.

उमेदवारी अर्ज वाटप करण्यास सुरुवात केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी रांग लावल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 2000 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. आतापर्यंत 165 जागांसाठी पुण्यातून अडीच हजार अर्ज भाजप (BJP) कार्यालयातून नेण्यात आले आहेत. भाजपचे उमेदवारी अर्ज फक्त भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीच नाही तर विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील नेले असल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास दहा ते पंधरा विरोधी पक्षातील पदाधिकारी नेत्यांनी, माजी नगरसेवकांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज नेले असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे.

Devendra fadanvis, Eknath Shinde, Tanaji Sawant
BJP Vs Congress : 1 लाख मतांनी जिंकलेल्या भाजप आमदाराकडेही पक्ष प्रवेशासाठी रांगा : काँग्रेसचा सुपडासाफ करण्याचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी देखील भाजपचा उमेदवारी अर्ज नेला असून त्यासोबतच एका अजित पवारांच्या पक्षात असलेल्या माजी महिला नगरसेवकांनी देखील भाजपचा उमेदवारी अर्ज घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या या महिला नेत्या माजी आमदाराच्या कन्या आहेत. त्यासोबतच आरपीआय आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपचे उमेदवारी अर्ज घेतले असल्याचे सांगितले जात आहे. या नेत्यांच्या पाठोपाठ आता एक मोठे नाव समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार असलेल्या तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मुलाने पुण्यातून महानगरपालिकेसाठीची उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज घेतला असल्याचे समोर आले आहे.

Devendra fadanvis, Eknath Shinde, Tanaji Sawant
Eknath Shinde : 'फडणवीस सावजीसारखे तिखट अन् नागपुरी संत्र्यासारखे गोड...', एकनाथ शिंदेंकडून स्तुतिसुमनांची उधळण

बुधवारी सायंकाळी पुणे भाजप कार्यालयात केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषद संपताच भाजपच्या शहर कार्यालय बाहेर तानाजी सावंत यांच्या संबंधित असलेली जेएसपीएम संस्थेची एक कार अचानक आली. त्यामध्ये सावंत यांच्या संस्थेतीलच काही कर्मचारी होते. त्यांनी भाजप कार्यालयातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज नेला असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर काही वेळातच या या कर्मचाऱ्यांनी गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज भाजपच्या कार्यालयात दाखल केला असल्याचा देखील बोलले जात आहे.

Devendra fadanvis, Eknath Shinde, Tanaji Sawant
Bharat Gogawale : शिंदेंच्या शिवसेनेवर दुसरा ‘कॅशबॉम्ब’! मंत्रीच अडचणीत? गोगावले म्हणतात, 'माझ्यावर ओरखडा देखील...'

याबाबत गिरीराज सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिवसेना हा आमचा पक्ष आहे. आमच्या घरात आमदार आहेत. त्यामुळे भाजपची उमेदवारी स्वीकारण्याचा किंवा घेण्याचा संबंध येत नसल्याचे म्हटले आहे. जरी गिरीराज सावंत यांनी या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले असले तरी खात्रीलायक सूत्रानुसार पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मधून गिरीराज सावंत यांनी अर्ज भरला आहे.

Devendra fadanvis, Eknath Shinde, Tanaji Sawant
Pune NCP : महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं टार्गेट लाडकी बहीण नव्हे तर 'Gen Z'

तानाजी सावंत यांचे निवासस्थान कात्रज परिसरामध्ये आहे. त्यामुळे त्या भागातूनच त्यांच्या मुलाला यंदाची महापालिका निवडणूक लढवायची असल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टिकोनातून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी इच्छुकांचा उमेदवारी अर्ज घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

Devendra fadanvis, Eknath Shinde, Tanaji Sawant
Devendra Fadnavis : CM फडणवीस नगरला खास डाळिंब खायला येणार; कोणाकडे अन् का?

गेल्या महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना यंदाच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे नाराज असल्याचे सांगितले जाते. मात्र भविष्यामध्ये त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता त्यांच्या मुलाने भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Devendra fadanvis, Eknath Shinde, Tanaji Sawant
Congress Thackeray Alliance : राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी; काँग्रेसच्या देशपातळीवरील मातब्बर नेत्याचे ठाकरेंशी गुफ्तगू, मनसेवर फैसला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com