Ajit Pawar Death Eknath Shinde  sarkarnama
महाराष्ट्र

Baramati plane crash: अजितदादांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांना दिल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना

Maharashtra government News : बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा ९ फेब्रुवारीला आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपला एक जवळचा सहकारी आणि मित्र गमावल्याची भावना व्यक्त करत एकनाथ शिंदेंनी सर्व प्रकारचे नियोजित सोहळे रद्द केले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारी गर्दी आणि उत्साह टाळण्यासाठी त्यांनी कार्यकर्ते, पक्षनेते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शुभेच्छा देण्यासाठी कुणीही पुष्पगुच्छ किंवा महागड्या भेटी आणू नयेत. रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नयेत, अशा प्रकारचे ट्विट करून एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत.

यावर्षी कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त केक कापणे किंवा इतर कोणतेही भव्य कार्यक्रम किंवा सार्वजनिक सोहळे आयोजित करू नयेत. वाढदिवसाचा खर्च टाळून तो निधी सामाजिक कार्यासाठी किंवा गरजूंना मदत करण्यासाठी वापरावा, असे संकेतही शिंदे यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनाने झालेली हानी कधीही भरून येणारी नाही. या वेदनेतून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. मी माझा एक कर्तव्यदक्ष सहकारी आणि मित्र गमावला आहे. अशा परिस्थितीत कोणताही सोहळा करणे मला उचित वाटत नाही. आपण सर्वांनी या परिस्थितीचे गांभीर्य राखून पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायला हवे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

संवेदनशीलतेचे कौतुक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 9 फेब्रुवारीला त्यांच्या शासकीय निवासस्थानी किंवा इतर कुठेही वाढदिवसाचे सेलिब्रेशन होणार नसल्याचे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे. शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रातून या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT