

खानापूर तालुक्यातील प्रचारसभेत शिवसेना आमदार सुहास बाबर यांनी भाजप नेत्यांना थेट आव्हान दिले.
मुख्यमंत्री कोणामुळे सत्तेत आहेत, यावरून बाबर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमधील वर्चस्वाचा संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Sangli Political News : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. सर्वच पक्ष आणि नेते पायाला भिंगरी बांधून प्रचाराला वेग देत असून आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार असून 9 तारखेला मतमोजणी होणार आहे.
याचदरम्यान सांगलीत पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. खानापूर तालुक्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार टशन पाहायला मिळत असून शिवसेना आमदार सुहास बाबर यांचे वक्तव्य वादाचे कारण ठरले आहे. त्यांनी थेट शिंदे आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत असा दावा केला आहे. यामुळे आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
यावेळी विटा-खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी त्यांच्यावर भाजपच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी, विट्याचे माजी नगराध्यक्ष भाजपचे नेते वैभव पाटील यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत हे भाष्य केले. सांगली जिल्हा परिषद निवडणुकी निमित्ताने खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, आमच्यासारखे 242 आमदार आहेत, म्हणून तुमचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे तुमच्या मुख्यमंत्र्यांना विचारा की सुहास बाबर कोण आहेत. खानापूर आटपाडी तालुक्यातील भाजपसह काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार, अजित पवार पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना आपण चालवतो. मी दिसतो शांत पण कार्यक्रम करायला लागलो. विट्यात मी काय केलंय हे माहित आहे असाही दावा बाबर यांनी केला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यात प्रचार सभा घेत तालुक्याला सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. या जाहीर सभेत वाळव्याच्या पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, सिंचन, उद्योग, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर शिंदे यांनी भर दिला. तसेच धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, असेही म्हणत मतदारांना धनुष्यबाणासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले होते.
1. सुहास बाबर यांनी काय वक्तव्य केले?
मुख्यमंत्री आमच्यासारख्या 242 आमदारांमुळे आहेत, असे वक्तव्य सुहास बाबर यांनी केले.
2. हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
खानापूर तालुक्यातील पळशी गावात जिल्हा परिषद प्रचारसभेत हे वक्तव्य करण्यात आले.
3. सुहास बाबर कोणत्या पक्षाचे आमदार आहेत?
सुहास बाबर हे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत.
4. या वक्तव्यामुळे कोणता वाद निर्माण झाला आहे?
शिवसेना आणि भाजपमधील वर्चस्वाचा व सत्तेचा वाद पुन्हा उफाळून आला आहे.
5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
युतीतील अंतर्गत तणाव वाढण्याची आणि आगामी निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.