Mahayuti MLC Election 2026 Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde: CM फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत ठाण मांडून; मोठा निर्णय होणार, एकनाथ शिंदेंनी जागा वाटपाबाबत स्पष्टच सांगितले...

Vidhan Parishad News : विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा अजून काही सुटलेला नाही. त्यामुळे एकीकडे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना जागा वाटपाबाबत स्पष्ट सांगितले आहे.

सरकारनामा ब्युरो

New Dehli News : राज्यातील कांदा व साखरप्रश्नी दिल्लीत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहांच्या उपस्थित सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक बुधवारी सायंकाळी पार पडली. त्यानंतरही राज्यातील प्रमुख तीनही नेते गुरुवारी दुपारपर्यंत दिल्लीतच होते. त्यामुळे विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा अजून काही सुटलेला नाही. त्यामुळे एकीकडे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना जागा वाटपाबाबत स्पष्ट सांगितले आहे.

दिल्लीत गुरुवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीबाबत माहिती दिली. महायुतीमधील सर्व जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीच्या (Mahayuti) जागा वाटपाचं घोडं नेमकं कुठे आडले आहे, असा प्रश्न यावेळी शिंदे यांना विचारण्यात आला, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'महायुती सर्व 17 जागा लढवेल आणि सर्व जागा जिंकेल. जागा वाटपाबाबत काय सुरू आहे, हे आता तुम्हाला उद्या कळेल. जागा वाटपाच्या फॉर्म्यूल्याबाबत कालच मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.'

महायुतीमध्ये जागा वाटप सन्मानांने होईल. महायुतीमध्ये जागावाटपाबत कुठलेही मतभेद नाहीत. महायुती एकमताने 17 जागा लढवणार आहे आणि सर्व जागा जिंकेल, असा विश्वास आहे, असे यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत तीन प्रमुख नेत्यांमध्ये गुरुवारी रात्री चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवारी महायुतीच्या जागावाटपाबाबत महायुतीकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवपीसांनी गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सध्या मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत आहेत. या भेटीत काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. यावेळी फडणवीस यांनी मोदी यांची भेट घेऊन राज्यातील विकास कामे व विविध प्रकल्पाविषयी विस्तृतपणे चर्चा केली असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT