eknath shinde, milind narvekar  Sarkarnama
महाराष्ट्र

Vidhan Bhavan News : विधानभवनात दोन बडे नेते आमनेसामने; शेकहँड होताच चर्चांना उधाण, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले

Maharashtra Politics News : विधिमंडळाच्या आवारातील या दोन नेत्यांच्या भेटीने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्याचे राजकारण गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या फोडाफोडीमुळे चांगलेच तापले आहे. गेल्या आठवडयात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारानी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे यांच्या सेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तिय सचिन अहिर यांनी अचानक शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेचे उपसभापती झाले. त्यामुळे ठाकरे यांच्या सेनेला मोठा धक्का बसला आहे. हा सर्व घटनाक्रम ताजा असतानाच बुधवारी विधानभवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू आमदाराचा हात हातात घेऊन शेकहँड करताच पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून गेल्या काही दिवसापासून ताकही फुंकून पिले जात आहे. त्यातच खासदार फुटल्यानंतर त्यापाठोपाठ आता आमदार फुटणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी दक्षता घेत मंगळवारीच आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलवली होती. या बैठकीला केवळ एक आमदार वगळता २२ आमदार हजार असल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यातच विधिमंडळाच्या आवारातील या दोन नेत्यांच्या भेटीने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.

बुधवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवन परिसरात येताच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तिय मिलिंद नार्वेकर पायऱ्या उतरत असताना दिसले. त्यावेळी शिंदे यांनी पुढे येत नार्वेकरांचे हातात हात घेऊन शेकहँड केले. या दोन बड्या नेत्यांमध्ये शेकहँड होताच विधिमंडळाच्या परिसरात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.

यापूर्वी एकनाथ शिंदे आमदारांना गुवाहटीला गेले होते. त्यावेळी ते थांबलेल्या हॉटेलमध्ये मिलिंद नार्वेकर हे गेले होते. यावेळी या हॉटेलमध्ये कोणालाच एंट्री नसताना याठिकाणी नार्वेकर हे शिंदेंच्या परवानगीने आत गेले होते. यावेळी नार्वेकर यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिंदेंची मनधरणी करण्यात नार्वेकर यांना त्यावेळी अपयश आले होते. मात्र, शिंदे यांच्यासोबत नार्वेकर यांचे संबंध चांगले राहिले आहेत.

त्यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या घरी जाऊन गणेशउत्सवाच्या काळात गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी देखील शिंदे व नार्वेकर यांच्या या भेटीमुळे ते शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यानंतरही नार्वेकर ठाकरे यांच्यासोबतच आहेत. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेची संधी देत निवडून आणले आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्यावर कायमच उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT