Eknath Shinde, Aditya Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde News : आदित्य ठाकरेंना वरळी नव्हे तर भेंडी बाजारसारख्या मतदारसंघातून लढावे लागणार; सीएम शिंदेंनी डिवचले

Sachin Waghmare

Shivsena Anniversary : वरळी मतदारसंघाचे आमदार असलेले माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केवळ सहा हजार मतांची आघाडी आहे. त्यामुळे येत्या काळात आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना वरळीऐवजी मुस्लिम बहुल असलेल्या भेंडी बाजारसारख्या या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर (Shivsena) सडकून टीका केली. यावेळी शिवसेनेचे नेतेमंडळी मोठया संख्यने उपस्थित होते. (Eknath Shinde News)

विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण ओबीसीवर कोणता अन्याय न करता दिले आहे. त्यामुळे ओबीसींना विनंती आहे की जाती जातीत तेढ करणाऱ्यांपासून सावध राहा. ज्यांनी द्यायला हवे त्यांनी दिले नाही. देणारे आम्ही आहोत देत राहणार, समाजालासोबत घेऊन जाण्याचा अजेंडा असल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde ) यांनी स्पष्ट केले.

आम्ही आल्यानंतर सणांवरील बंदी काढली. कापूस, कांदा दूधवर परिणाम झाला होता. आचारसंहितेमुळे पैसे वाटू शकलो नाही पण आता देऊ. शेतकरी आणि महिला सक्षमीकरणासाठी व तरुणांसाठी आम्ही पॉलिसी बदलून न्याय दिला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यापूर्वीच्या सरकारने लुबाडले आहे. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना अनुदान दिले आहे. त्यामुळे वारकरी वारी तुम्हाला घरी बसल्याशिवाय राहणार नाही. आपली उत्सव परंपरा संस्कृती पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदेनी केले.

SCROLL FOR NEXT