Maharashtra Elections 2024 Shiv Sena List :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आज(रविवार) दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गजांना संधी दिली गेली आहे. ज्यामध्ये मिलिंद देवरा यांना वरळी मतदारसंघातून तर निलेश राणे यांना कुडाळ मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आहे. याशिवाय दिंडोशी येथून संजय निरुपम यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या (Shivsena) दुसऱ्या यादीत एकूण 20 जणांना संधी दिली गेली आहे. या यादीत मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुरजी पटेल यांनी आजच भाजप मधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्या सकाळी अंधेरी पूर्वेतील संकट मोचक मारुती मंदिर या ठिकाणाहून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत.
याशिवाय अक्कलकुआ , बाळापूर, रिसोड, हादगाव, नांदेड दक्षिण, परणभीण, पालघर, बोईसर, भिवंडी ग्रामीण, भिवंडी (पूर्व), कल्याण (पश्चिम), अंबरनाथस, विक्रोळी, दिंडोशी, अंधेरी (पूर्व), चेंबूर, वरळी, पुरंदर, कुडाळ आणि कोल्हापूर उत्तर या 20 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत.
यामध्ये रिसोड मतदारसंघामधून भावना गवळी, कोल्हापूर (उत्तर) मतदारसंघामधून राजेंद्र क्षीरसागर तर पुरंदर येथून विजय शिवतारे यांनी उमेदवारी जाहीर केली गेली आहे.
(Editedc by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.