Shivsena UBT News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दररोज मोठ्याप्रमाणावर राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे प्रत्येक पक्ष उमेदवारी याद्या जाहीर करत आहे, तर दुसरीकडे इच्छुक उमेदवार, नेते आपल्या सोयीप्रमाणे पक्ष बदलताना दिसत आहेत. तर काहीजण 'घरवापसी' करताना दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा स्वीकार केला आहे. हाती शिवबंधन बांधत त्यांनी एकप्रकारे घरवापसी केली आहे. कालच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती.
अशाप्रकारे शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) उपनेते आणि माजी आमदार बबनराव घोलप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी घोलप यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
बबनराव घोलप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी देवळाली विधानसभा मतदारसंघात बबनराव घोलप यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा बबनराव घोलप यांनी सुद्धा स्वगृही प्रवेश केला. विशेष प्रतिनिधी वडील बबनराव घोलप जरी एकनाथ शिंदेंसोबत (Eknath shinde) गेले होते तरी योगेश घोलप मात्र शिवसेना ठाकरे गटासोबत होते.
मागील काही दिवसांपासून देवळाली हा मतदारसंघ चर्चेत होता. कारण, या ठिकाणच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात चांगलीच रस्सीखेच सुरू होती. अखेर हा मतदारसंघ आपल्या वाट्याला घेण्यात उद्धव ठाकरेंना यश आलं आणि त्यांनी बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांची उमेदवारीही येथून जाहीर केली.
या ठिकाणी आत्या त्यांची लढत महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सरोज अहिरे यांच्याशी असणार आहे. तर इकडे मुलाला उमेदवारी जाहीर होताच बबनराव घोलप यांनीही पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.