ajit pawar, manikaro kokate, devendra fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra political tension : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची? फडणवीसांचा सवालाने टेन्शन वाढले; अजितदादांचा नांदेड दौराही रद्द

Devendra Fadnavis news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन वाढले असतानाच आता पुन्हा एकदा सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे हे दोषी आढळल्याने त्यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

Manikrao Kokate News : क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित मानला जात आहे. सदनिका घोटाळ्यात नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या चर्चेदरम्यान, कोकाटेंची खाती कोणाला द्यायची? असा स्पष्ट सवाल फडणवीस यांनी अजितदादांना केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

त्याचवेळी कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यासाठी अंजली दिघोळे यांनी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे कोकाटे यांचे मंत्रिपद जाण्याचे संकेत असतानाच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मात्र कोकाटे यांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली असून त्यासाठीची प्रकियाही सुरु केली आहे. यावर कोर्टात काय होते, ते बघूनच कोकाटे यांच्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचा आजचा नांदेड दौराही रद्द केला आहे.

माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या पाठीमागील शुक्लकाष्ट काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेऊन एक वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र, नेहमीच ते चर्चेत राहिले आहेत. कृषिमंत्री असताना त्यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा सगळीकडे रंगली होती तर चार महिन्यापूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे फडणवीस यानी कोकाटेकडील कृषीखाते दत्तात्रय भरणे यांना दिले होते. तर कोकाटे यांना क्रीडा खाते देण्यात आले होते.

त्यानंतर मंगळवारी जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना बनावट दस्तावेज व फसवणूक प्रकरणी न्यायालयाने 2 वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

दरम्यान, या निकालाविरोधात मंत्री कोकाटे यांनी पर्यायी कायदेशीर मार्गांची चाचपणी सुरू केली आहे. बुधवारी सकाळी अजितदादांनी नांदेडचा दौरा रद्द करून फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये वर्षा या निवासस्थानी सविस्तर चर्चा झाली आहे. त्याचवेळी कोकाटेंची खाती कोणाला द्यायची? फडणवीसांच्या सवालाने अजितदादांचे टेन्शन वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT