Loksabha Election : लोकसभा निवडणूक अजित पवार गट घड्याळ चिन्हावर अवघ्या चार जागा लढत आहेत. शिंदे गटाचे 13 खासदार असूनही ते 15 जागा लढत आहेत. त्यामुळे अजित पवारांचा महायुतीत सन्मान राखला जात नसल्याची टीका होत होती. लोकसभेला Loksabha Election केवळ चार जागा दिल्या असताना विधानसभेला अजित पवार गटाला किती जागा मिळणार याची चर्चा होत आहे. या चर्चेला अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी उत्तर दिले आहे.
एका मुलाखतीत प्रफुल पटेल Praful Patel म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत तीन पक्षांच्या महायुतीत कमी जागा आल्या असल्या तरी विधानसभेला जागावाटपात अधिक जागा घेऊ. तीन पक्षांमध्ये जागावाटप करताना अनेक अडचणी होत्या. सारासार विचार करूनच आम्ही कमी जागा स्वीकारल्याचे देखील पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी NCP चार जागांवर लढली. सातारची जागेवर आमचाच दावा होता. मात्र, उदयनराजेंसाठी आम्ही ती जागा सोडली. त्या बदल्यात राज्यसभेची एक जागा आम्हाला मिळणार आहे. परभणीची जागा देखील तीनही पक्षांनी मिळून ती राष्ट्रीय समाजवादी पक्षाला सोडली. याचा अर्थ सहा जागा आम्हाला मिळाल्या होत्या, असे प्रफुल पटेल म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार यांनी एकदा विधानसभेला 90 जागा लढवू,असे विधान केले होते. तेवढ्या जागा मिळतील का? असे प्रफुल पटेल यांना विचारेला असता नक्की किती जागा मिळतील हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, लोकसभेची भरपाई विधानसभेत करू, असे पटेल म्हणाले.