- अक्षय बडवे
Pune News, 8 May : देशभर गाजलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील ( Baramati Lok Sabha Constituency ) मतदान संपताच मतांच्या टक्केवारीची गोळाबेरीज करून निवडणुकीच्या निकाला अंदाज मांडला जात आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत 56 टक्के मतदान झालं. 2019 च्या निवडणुकीत 61.70 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे 5 टक्क्यांनी मतदान घसरल्यानं महायुतीच्या नेते डोके खाजवायला लागले आहेत. गंभीर म्हणजे, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घसरलेल्या मतदानाने नाराज असल्याचेही बोलले जात आहे.
यातच महायुतीचे बडे नेते एकेमकांची उणीदुणी काढत असल्याचा प्रकार पुण्यातील एका बैठकीत घडल्याची चर्चा आहे. बारामती जिंकण्याच्या इरेला पेटलेल्या भाजप नेत्यांनी टोकाची भाष्य केल्यानेच बारामतीतील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते काढत असल्याचे पढे येत आहे. त्यातूनच राष्ट्रवादीचे नेते घटलेल्या मतदानाचे खापर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांच्यावर फोडत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. 'बारामतीत आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे,' असे विधान पाटील यांनी प्रचार सभेत केले होते. त्याचा परिणाम, पाटील यांची ही बघून घेण्याची भाषा बारामतील मतदारसंघातील मतदारांना बोचरी ठरल्याचा समज आता अजितदादांच्या समर्थकांनी करून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ते अजितदादांनी ( Ajit Pawar ) कर्वे रस्त्यावरील अंबर हॉल येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत मंगळवारी अप्रत्यक्षपणे बोलून दाखविल्याकडे मीडियाने लक्ष वेधले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पाटील यांच्या जुन्या भाषणाचा थेट नाही; पण अप्रत्यक्षपणे धागा पकडून अजितदादांनी मेळाव्यातच खंत व्यक्त केल्याचे दिसत आहे. या बैठकीला पाटील यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. 'हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटेत,' अशा शब्दांत अजितदादांनी आपली खदखदच व्यक्त केल्याचा आधार मीडियात घेतला जात आहे. परिणामी, बारामतीच्या मतदानानंतर आता महायुतीच्या नेत्यांतील धुसफूस उघड होण्याची चिन्हे आहेत.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
17 मार्चला बारामतीत महायुतीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात जात आव्हान दिलं होतं. "राजकारणात तराजू लावायचे असतो, शरद पवारांचा पराभव हा आम्हाला जास्त वजनदार वाटतो. महाराष्ट्रात 2019 मध्ये शरद पवारांनी शिवसेनेला बाहेर काढून राज्याला फसविले. नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी फसवणूक केली, आता आम्हाला शरद पवार यांचा हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे, मला व माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा पराभव करायचा इतना काफी है...बाकी गोष्टी आमच्यासाठी कमी महत्वाच्या आहेत," असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
रोहित पवारांकडून 'लाव रे तो व्हिडीओ'
दरम्यान, बारामतीत 5 मे रोजी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या पराभवाबद्दल केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ लावला होता. 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.