Nashik News : पूजा खेडकर यांची IAS विभागाकडून चौकशी सुरु आहे. त्यासोबतच आमच्याकडून सचिव स्तरावर चौकशी सुरू आहे. समोर आलेल्या बाबीची सत्यता पडताळणी सुरू आहे. खेडकर यांच्या बद्दल माझ्याकडे काही माहिती नाही. माझ्या विभागाचा त्यांचा संबंध नाही. जिल्हाधिकारी यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. त्यांच्या नेमणुकीबाबत प्रश्न असल्यावर त्यांनी आरोप करणे अतिशय चुकीचे आहे. त्याबाबत चौकशीच्या सूचना दिल्या गेल्या असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
नाशिक येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यातील महायुतीचे जागा वाटप लवकरच होणार आहे. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीत चर्चा झाल्यावर त्याबाबत सांगितले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांना प्रश्न केला असता त्यांनी कुणी काय बोलावे यात मला स्वारस्य नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले. (IAS Pooja Khedkar News )
छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले राजकीय प्रवाहात स्वतःची मते असतात. शरद पवार यांच्याकडे ते मार्गदर्शन घेण्यासाठी गेले असतील. या वातावरणात काय भूमिका घ्यावी यासाठी गेले असतील. त्यामध्ये आक्षेपार्ह काही नाही. सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी विरोधी लोकांशी बोलू नये, असे होत नसते. पक्षीय राजकारणापालिकडे जावे लागते, असेही त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना राबविताना तहसील कार्यालयावर ताण येणार आहे. त्यासोबतच बाकीच्या योजनाही आहेत. सगळ्या यंत्रणेचा समन्वय केला जातोय. त्यासाठी ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या काळात आणखी मनुष्यबळ वाढवून आमच्या कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे. जरांगे यांच्या उपोषणाबाबत बोलताना विखे-पाटील म्हणाले मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण 10 टक्के दिले आहे. त्यामधून योग्य तो मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.
तलाठी आंदोलनप्रश्नी शिष्टमंडळ भेटले आहे. त्यांच्या मागण्या होत्या. त्या संघटनेच्या लोकांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न असणार आहे. राज्यातील दूध उत्पादक नाराज आहेत. आपल्याकडे प्रक्रिया करण्याची व्यवस्था नाही. गुजरातचे लोक 40 लाख लिटर घेतात, त्यांना आणखी घ्यायला सांगितले आहे. आपण 3 मोठे निर्णय घेतले असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
विशाळगड अतिक्रमणाबाबत बोलताना विखे-पाटील म्हणाले, मला वाटत नाही मतमतांतरे आहेत. छत्रपती महाराज तिथं गेले आहेत. निवडणूक आल्यावर वेगवेगळे विषय येत असतात असेही ते म्हणाले. कांदा अनुदान सुरू राहिले पाहिजे. मी त्या संदर्भात मंत्र्यांशी बोलणार आहे. कांदा चाळ अनुदान वेगळा विषय आहे. 5 लाख मेट्रिक कांद्याची मागणी केली आहे. ही मागणी पुरवू शकत नाही. गैरसमज दूर होईल. कांद्याबाबत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.