Uddhav Thackeray-Eknath Shinde-Imtiaz Jaleel News Sarkarnama
महाराष्ट्र

Imtiaz Jaleel News : पक्ष सोडून जा, पण ज्यांनी मोठं केलं त्यांच्याबद्दल वाईट तर बोलू नका! इम्तियाज जलील यांचा शिंदे गटाला सल्ला..

Imtiaz Jaleel reprimands Shinde group leaders for their criticism of Uddhav Thackeray. : संपूर्ण देशात महाराष्ट्रातील राजकारण घाणेरडे बनले आहे. बदनामी अन् धोकेबाजीमुळे महाराष्ट्र ओळखला जाऊ लागला आहे. अशा राजकारणाचा वीट आला असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.

Jagdish Pansare

Shiv Sena News : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चांगलेच प्रेमात पडले आहेत. कधी ते चंद्रकांत खैरे यांच्या प्रामाणिकता, निष्ठेला सलाम करतात, तर कधी उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांना सुनावतात. रिक्षावाला, भाजी विकणारा, रस्त्यावरच्या माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं, उद्धव ठाकरेंनी प्रतिष्ठा, मान, सत्ता, पैसा मिळवून दिली. पण आज त्यांच्यावरच टीका, वाईट भाषेत बोललं जात.

तुम्हाला पक्ष सोडून जायचे असेल, तर जा पण किमान ज्यांच्यामुळे तुम्ही आज धनदांडगे झाला आहात, त्यांच्याबद्दल वाईट भाषा तर वापरू नका, अशा शब्दात इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिंदे गटातील नेत्यांना सल्ला दिला. संपूर्ण देशात महाराष्ट्रातील राजकारण घाणेरडे बनले आहे. बदनामी अन् धोकेबाजीमुळे महाराष्ट्र ओळखला जाऊ लागला आहे. अशा राजकारणाचा वीट आला असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.

2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी आपल्याला राजकारणाचा वीट आल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. यावरून आता ते राजकारणातून निवृत्त होणार आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. (Shivsena) यावर आपण नाराज आहोत, पण म्हणून राजकारण सोडणार असा नाही? जात आणि पैशाच्या जोरावर जर मतदान होत असेल तर तुम्ही कितीही चांगले काम केले, तर त्याचा काही उपयोग होत नाही.

दहा वर्ष मी विधानसभा आणि लोकसभेत सातत्याने जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला. पण लोकांनी शेवटी जातीला महत्व दिले. मी पराभूत झालो या पेक्षा राज्यातील राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे, हे पाहून मनाला वेदना होतात, असे इम्तियाज जलील म्हणाले. शिवसेनेतील फूट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर होणारी टीका यावरही त्यांनी भाष्य केले. राजकारणात न्यूटनचा सिद्धांत लागू होतो. एखादी वस्तू जितक्या वेगाने वर जाते, त्यापेक्षा दुप्पट वेगाने ती खाली येते.

आज देशात मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस सत्तेवर आहेत, उद्या ते ही खाली येतील. एकनाथ शिंदेही पायउतार होतील आणि दुसरा कोणी सत्तेवर येईल. तेव्हा तुमचे काय होईल? याचाही विचार आज टीका करणाऱ्यांनी केला पाहिजे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाबद्दल म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या खालच्या स्तरावर त्यांच्या पक्षातून बाहेर पडलेले नेते टीका करतात ते पाहून वाईट वाटते. रस्त्यावरच्या साध्या माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी मोठे केले, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT