Baramati News : बारामती येथील आगामी काळात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आढावा घेतला. राजकारणात अनेक चढ-उतार आले पण सर्वसामान्य बारामतीकर कायम माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. रविवारी दिवसभर पुणे जिल्हयातील नगरपालिका निवडणुकीबाबत बैठका घेतल्यानंतर बारामती नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोठे विधान केले.
जय पवार बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये? आहेत का असा प्रश्न विचारल्यानंतर 'मी चर्चा ऐकली आहे, मात्र तसे काही होणार नाही.' या निवडणुकीच्या रिंगणात जय पवार नसणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करीत चर्चेला पूर्णविराम दिला.
यावेळी मुंढवा जमीन प्रकरणात चौकशी सुरु आहे. या जमीन प्रकरणात एक रुपयांचा देखील व्यवहार झालेला नाही. या प्रकरणात गुन्हा नोंद झाला असून चौकशीनंतर जनतेसमोर सत्य येईल. निवडणुका जवळ आल्याने आरोप केले जात आहेत. 15 वर्षांपूर्वीच माझ्यावर अशाच प्रकारे आरोप झाले आहेत. मात्र, त्याबाबतचे पुरावे अद्याप कोणीच दिलेले नाहीत, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.
महायुतीबाबत भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र मिळून निर्णय घेतील. त्यासाठी ताकद असलेल्या ठिकाणी स्वबळावर लढण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा असतो. मात्र, आगामी काळात होत असलेली मतविभागणी टाळण्यासाठी महायुतीने एकत्रित निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बारामतीमधील इच्छुकांची मुलाखत गुरुवारी घेणार आहे. त्यानंतर उमेदवार फायनल करण्यात येणार आहेत. त्यासोबतच येत्या काळात मळेगाव नगरपंचायतीचा कायापालट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात होत असलेल्या बारामती नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात जय पवार नसणार असल्याचे यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.