Pune BJP : पुणे पालिकेच्या 165 जागांसाठी भाजपमध्ये 1000 इच्छुक, उमेदवारी निश्चितीसाठी अशी लागणार कात्री, 50 टक्के दिग्गजांचे पत्ते कट होणार

BJP Pune Election 2025 : निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे.
BJP Kolhapur
BJP leaders’ posters displayed across Kolhapur during Diwali spark controversy, highlighting growing internal tensions ahead of the civic elections.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 09 Nov : निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे.

त्यामुळे आता महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या उत्साहामध्ये पक्षाची उमेदवारी मिळणार का नाही? याची धाकधूक देखील लागलेली आहे.

पुणे पालिकेचा विचार केला तर भाजप पुण्यात स्वबळावर निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे जबाबदारी भाजपने माजी सभागृह नेते असलेल्या गणेश बिडकर यांच्यावर सोपवली आहे. त्यांची नियुक्ती निवडणूक प्रमुख म्हणून करण्यात आली आहे.

निवडणूक प्रमुख आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांवर पुण्यातून उमेदवार निवडीची अत्यंत जटिल प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी असणार आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये चारहून अधिक जण भाजपकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत. तसेच इन्कमिंगसाठी देखील मोठी यादी सध्या भाजपकडे असल्याचं पाहायला मिळत आहे.

BJP Kolhapur
Nagpur Mahayuti News: नागपूर ग्रामीणमध्ये राजकीय घडामोडींना वेग; भाजपला सोडून शिवसेना-राष्ट्रवादीच्या वाटाघाटी

सध्याची परिस्थिती पाहता 165 जागांसाठी भाजपकडे तब्बल 1000 इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आत्तापासूनच भाजपने उमेदवार निवडीबाबतचे निकष ठरवण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या या निकषांमध्ये तरुण नेतृत्वाला अधिकाधिक संधी देण्याचा फॉर्मुला तयार करण्यात आला आहे. ज्येष्ठांना बाजूला ठेवून तरुणांना संधी देऊन भविष्यातलं नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टिकोनातून भाजप या निवडणुकीत पावलं टाकणार आहे.

जे पक्षासाठी पळू शकतील, पोस्टर लावू शकतील झेंडे घेऊन उभे राहू शकतील अशा तरुण तडफदार नेतृत्वालाच संधी देण्याचा विचार सध्या भाजपकडून करण्यात येत आहे. जे इन्कमिंग होणार आहे त्या इन्कमिंगमध्ये देखील याच पद्धतीचा क्रायटेरिया वापरून प्रस्थापित नेत्यांना घेण्यापेक्षा नवीन तडफदार नेतृत्व जे पक्षाच्या विचारसरणीला आपलंसं करू शकेल अशांना संधी देण्याचा विचार पक्ष नेतृत्वाकडून करण्यात येत आहे.

BJP Kolhapur
Mahayuti Politics : भाजप धनंजय मुंडेंना धक्का देण्याच्या तयारीत, परळीत पंकजा मुंडे स्वबळाचा नारा देणार?

मात्र, भाजपाच्या या धोरणामुळे यंदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या भाजपमधील शंभरहून अधिक माजी नगरसेवकांमधील अनेकांचे पत्ते कट होणार आहेत. जवळपास 50% माजी नगरसेवकांचे पत्ते कट करण्यात येणार आहेत. 50% नवे आणि 50 टक्के जुने अशांचा समतोल साधण्याचा विचार सध्या भाजपकडून करण्यात येत आहे.

तसेच ज्येष्ठ असलेल्या माजी नगरसेवकांच्या घरातील तरुण नेतृत्वाला देखील संधी दिली जाऊ शकते असं देखील सांगितलं जात आहे. तसेच प्रभाग निहाय पुढील पक्षातून संभाव्य स्ट्राँग उमेदवार कोण आहे. याचा विचार करून मॅन टू मॅन मार्किंगच्या आधारे अंतिमता उमेदवारी निश्चित करण्यात येणार आहे. सर्वेच्या आधारे प्रभागातील ताकद निश्चित करून त्याच दृष्टीकोनातून पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये जे संभाव्य प्रवेश रखडले आहेत ते संभाव्य प्रवेश देखील होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com