Jayant Patil, Sadabhau khot  Sarkarnama
महाराष्ट्र

BJP entry claim : भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून जयंत पाटलांनी दिले खोतांना जोरदार प्रत्युतर; म्हणाले,'दहा पक्ष बदलून...'

Sangli Zilla Parishad Election News : भाजपचे नेते व आमदार सदाभाऊ खोत यांनी माजी मंत्री जयंत पाटील काही दिवसातच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता.

सरकारनामा ब्युरो

Sangali News : राज्यात सध्या 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच भाजपचे नेते व आमदार सदाभाऊ खोत यांनी माजी मंत्री जयंत पाटील काही दिवसातच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. या खोत यांच्या दाव्यानंतर जयंत पाटील यांनी खोतांना जोरदार प्रत्युतर दिले आहे.

सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन माजी मंत्र्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना (Shivsena) महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मोठे वक्तव्य केले होते.

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले होते की, 'आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत.थोडया दिवसात ते भाजपमध्ये येतील', असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले होते. भाजपने त्यांना घ्यायचे का नाही, ते बघावे, कारण सत्ते विना ते बाळ जगू शकत नाही. कधी उडी मारायचे, ते बघायला लागले आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटलांचे नाव न घेता खोतांनी लगावला होता.

जयंत पाटलांनी राष्ट्रवादी विलनीकरणाबाबतकेलेल्या विधानावरून खोत यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. अजितदादा जयंत पाटील यांच्याकडे हेलपाटे मारत होते. तुमच्याकडे काय पाच-पन्नास आमदार आहेत का? अरे तुमच्या पडक्या घरात मुक्कामाला कोणी जातेय का? अजितदादा केवढा मोठा माणूस. ते गेल्यावर अक्खा महाराष्ट्र हळहळला, असे म्हणते सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांना टोला लगावला.

दुसरीकडे सदाभाऊ खोतांच्या टीकेवर जयंत पाटील यांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. वाळवा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 'दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे, आणि तोच मला म्हणतोय भाजपमध्ये जाणार”. जयंत पाटील यांनी खोत यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करत त्यांच्यावरच निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT