ACB Raid On Rajan Salvi Sarkarnama
कोकण

ACB Raid On Rajan Salvi : राजन साळवींवरील कारवाई सूडबुद्धीतून; विनायक राऊतांचा आरोप

Kokan Political News : निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या कोणत्याही दडपशाहीला बळी पडणार नाहीत

Chetan Zadpe

Ratnagiri Political News : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर अँटी करप्शन विभागाने कारवाई केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी ही कारवाई म्हणजे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला आहे. (Latest Marathi News)

'साळवी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून केलेल्या आजच्या ACB च्या कारवाईचा मी धिक्कार करीत आहे. कितीही त्रास झाला तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाही,' असे ठणकावून सांगणाऱ्या आमदार राजन साळवी आणि सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना जाणीवपूर्वक त्रास देवून मिंधे गटामध्ये सामील होण्यासाठी अशी कपट कारस्थाने केली जात आहेत.

परंतु अश्या दमनशाहीला भीक न घालणाऱ्या आमदार राजन साळवी यांचा मला अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. यासोबतच मी ACB चे अधिकारी आणि सध्याचे सत्ताधारी सांगू इच्छितो की, आमदार राजन साळवी यांच्यासारख्या लाखो निष्ठावंतांच्या सामर्थ्यातूनच उद्याची शिवसेना उभी राहणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या कोणत्याही दडपशाहीला बळी पडणार नाहीत, असे खासदार विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. यामुळे आता कोकणात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT