Local Body Elections DCM Ajit Pawar And Eknath Shinde sarkarnama
कोकण

Ajit Pawar NCP : शिंदेंचा अजित पवारांना तळकोकणात धक्का; उदय सामंतांचाही इशारा

kaka Kudalkar Joins Shinde’s Shiv Sena : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तळकोकणात मोठा धक्का बसला असून मित्र पक्ष शिवसेनेनं मोठा नेता आपल्या गळाला लावला आहे.

Aslam Shanedivan

  1. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  2. या प्रवेशामुळे रायगडसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.

  3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच हा प्रवेश अजित पवारांसाठी मोठा धक्का ठरतो आहे.

Sindhudurg News : आगामी स्थानिकच्या आधी तळकोकणात राजकीय वातावरण आता चांगलेच तापण्यास सुरूवात झाली आहे. ज्या पद्धतीने कोकणातील रायगड जिल्ह्यात महायुतीत पक्ष फोडीवरून धूसफूस सुरू आहे. तशीच धूसफूस सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. येथे एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये पदाधिकारी-कार्यकर्ते फोडण्याचे सत्र सुरू झाले होते. ते वारे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सरकले आहे. येथे शिवसेनेनं राष्ट्रवादीचा बडा मासा गळाला लावला असून यामुळे स्थानिकच्या तोंडावर अजित पवार यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.

येथील महालक्ष्मी हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी उद्योगमंत्री व सिंधुदुर्ग संपर्कमंत्री उदय सामंत, माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, संजू परब, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, दिपलक्ष्मी पडते, आनंद शिरवलकर, दिनेश साळगावकर आदी उपस्थित होते.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर सध्यातरी पक्षाचे इतर कोणी प्रवेश केलेला नाही. तसेच यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत पक्षाक प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी स्थानिकच्या आधीच अजित पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांना धक्का बसल्याचे मानले जात आहेत.

यावेळी उदय सामंत यांनी, कोणत्याही दबावाला बळी न पडता तो झुगारुन भगवा फडकवा. कुडाळ विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी 15 जिल्हा परिषद जागांवर शिवसेना जिंकणारच आहे. महायुती असो वा मैत्रीपूर्ण लढत, आम्ही तयार आहोत. आपल्या आमदारावर कुणी आघात केला तर तो थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आघात मानला जाईल, असा इशारा दिला आहे.

तसेच आमदार केसरकर यांनी, ‘पूर्वी तुम्ही नेत्यांची लढाई जिंकली, आता कार्यकर्त्यांची लढाई आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे यांचे भक्कम नेतृत्व आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने निवडणूक लढा. विजय आपलाच आहे.’

यावेळी आमदार निलेश राणे यांनी,‘मित्रपक्षाला चर्चा करण्यासाठी फोन केले होते. पण, प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्याची वेळ आलीय. उद्या हातून संधी निसटली तर किंमत उरणार नाही. सावंतवाडीत केसरकरांचे ठरेल, कुडाळात आमचे ठरेल. आता तडजोड नाही. महायुती झाली नाही तर स्वबळावर विजय मिळवणार. कुडाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व 15 जागा आणि मालवण नगरपंचायत जिंकणारच.’ असाही हुंकार राणेंनी केला आहे.

FAQs :

1. काका कुडाळकर कोण आहेत?
ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष होते.

2. त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
काका कुडाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

3. या प्रवेशामुळे कोणाला फटका बसला आहे?
हा प्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

4. हा प्रवेश कधी झाला?
स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच हा प्रवेश जाहीर करण्यात आला.

5. याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
रायगड जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढेल आणि राष्ट्रवादीची संघटनात्मक स्थिती कमकुवत होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT