Bharat Gogawale visit Sunil Tatkare Residence; Mahendra Dalvi sarkarnama
कोकण

Shivsena Politics : गणपती दर्शनावरून शिवसेनेत नाराजी नाट्य; आमदाराच्या सूचक टोल्यावर पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण; गोगावले म्हणाले, 'माझे कर्तव्य...'

Raigad Ganpati Darshan Controversy : रायगड जिल्ह्यात एकीकडे शिंदेंची शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा वाद सुरू असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेतच खटके उडताना दिसत आहेत.

Aslam Shanedivan

Raigad Shivena NCP Political controversy News : रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून सुरू असलेला शिंदेंची शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा वाद आता शांत झाला आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेतच खटके उडताना दिसत आहेत. तर पालकमंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी घेतलेल्या गणपती दर्शनावरून नवा वाद सुरू झाला आहे. यावरून आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावले यांच्यावर निशाना साधत नाराजी व्यक्त केली होती. पण आता या वादावर पडदा पडला असून आमदारांची नाराजी दूर केल्याची ग्वाही गोगावले यांनी दिली आहे. तसेच त्यांनी दळवींना सबुरीचा सल्ला दोखील दिला आहे.

रायगडच्या राजकारणात तटकरे आणि गोगावले यांच्यातील मतभेदांची चर्चा होत असतानाच त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गौरी-गणपतीचे दर्शन घेतले. या भेटीनंतर गोगावले तटकरेंशी जुळवून घेत असून राजकारणात काहीही शक्य आहे, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. तर या भेटीमुळे रायगडमधील राजकारण चांगलेच तापले होते.

या भेटीवरून शिवसेनेत अस्वस्थता वाढल्याचे दिसले होते. आमदार महेंद्र दळवी यांनी तर या भेटीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत तटकरे गोगावले यांच्या निवासस्थानी आले असते का?असा सवाल उपस्थित केला होता. गोगावलेंना सूचक टोला लगावत 'गणपतीबाप्पाचे दर्शन घेणे काही चुकीचं नाही. मात्र आम्ही केलेला संघर्ष आणि त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंनी घेतलेली ही भूमिका चुकीचे असल्याचे दळवी म्हणाले होते. तर अशा गोष्टी गोगावलेंनी टाळाव्यात असा सल्ला देखील दळवींनी दिला होता.

या सर्व घडामोडी आणि नाराजी नाट्यावर आता गोगावले यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी, गणपती दर्शनासाठी आम्ही गेलो होतो, बाकी काही नाही आहे. ठिक आहे. पण हाताची बोटं काही सारखी नाहीत. वर खाली असतात. त्याप्रमाणे थोडं झालं. पण हरकत नाही. तर आमचे आमदार किंवा नेते जे सांगत आहेत. त्यातही काही चूक नाही. त्यांना वाटतं की आम्ही संघर्ष करत आहोत. मात्र पालकमंत्री म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाणे हे आमचे कर्तव्य असे म्हणत आमदारांची नाराजी आता दूर झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तटकरे कुटुंबावर गंभीर आरोप

दरम्यान दळवींनी तटकरे कुटुंबावर गंभीर आरोप करत गेल्या २० वर्षांत रायगडमध्ये झालेल्या विविध प्रकल्पांवर आणि निधीच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले होते. काही प्रकल्प अर्धवट असल्याचा आरोप करत त्यांनी एकाच कामासाठी वारंवार निधी दिल्याचा दावा देखील केला होता.

राजकीय टोलेबाजी

त्याचबरोबर गोगावले यांच्याकडून तटकरे कुटुंबाना दिले जाणाऱ्या श्रेयावरून देखील दळवी यांनी निशाना साधला होता. त्यांनी गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळण्यामागे तटकरे कुटुंबाची कोणतीच भूमिका नाही. तर गोगावलेंना हे पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून मिळाल्याचा दावा दळवींनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT