Shivsena Politics : मनोज जरांगे पाटलांवर भरत गोगावले पुन्हा बोलले, शिंदेंवरील टीकेवर दिली थेट प्रतिक्रिया; 'टीका-टिप्पणी करू नये...'

Bharat Gogawale On Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेला तिसरा अर्जदेखील मुंबई पोलिसांनी फेटाळला असून, त्यांची मागणी मान्य केलेली नाही. मात्र, ते आंतरवाली सराटीतून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.
Bharat Gogawale And Manoj Jarange Patil
Bharat Gogawale And Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले असून, आज त्यांच्या आंदोलनाचा १८ वा दिवस आहे. दरम्यान, त्यांनी केलेला तिसरा अर्जदेखील नाकारला असून, त्यांना मंजुरी दिलेली नाही. यानंतरदेखील जरांगे पाटील आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यावरून शिवसेना आमदार आणि महायुतीतील मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गोगावले यांनी, जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात सरकार चर्चा करण्यास तयार असून, ते आल्यास त्यांना सामोरे जाऊ, असे म्हटले आहे. याचवेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडून होणाऱ्या टीकेवरदेखील भाष्य केले आहे. याआधीदेखील गोगावले यांनी जरांगे पाटील यांना यावरून अंगावर घेतले होते.

त्यांनी, आमच्या नेत्यांवर कोण बोलेल तर कोणताही नेता सहन करणार नाही. एकनाथ शिंदेंनी मागे-पुढे पाहिलं नाही, आरक्षण दिलं. ५ हजार ३०० जणांना नोकऱ्या दिल्या, सारथीला न्याय दिला. असे असतानाही जर शिंदेंवर कोणी बोललं तर आम्ही पण उत्तर देऊ, आम्ही पण मराठे आहोत, आमच्यावर पण केसेस आहेत, असे उत्तर गोगावले यांनी दिले होते.

Bharat Gogawale And Manoj Jarange Patil
Bharat Gogawale: गोगावलेंच्या विधानानं खळबळ! पालकमंत्रीपदाचं श्रेय दिलं तटकरेंना; रायगडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

आता पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदेंवरील टीकेवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, याआधीदेखील टीका-टिप्पणी करू नये याबाबत आम्ही सांगितलं आहे. पण हरकत नाही, कोणी टीका-टिप्पणी केली म्हणून काही होत नाही. आमचे नेते कसे आहेत, त्यांचे काम अख्ख्या राज्यासह देशाला माहिती आहे. मग राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस किंवा शिंदे यांना कोणी पत्र द्यायलाच पाहिजे, अशातला भाग नाही. आम्ही, आमचे नेते जे प्रामाणिकपणाने जे काम करत आहोत, त्याने आम्ही त्यांना सामोरं जाऊ.

पण आता असं काय घडलं की टीका करताना दिसत आहेत. आता मुंबईला येत येतच आहेत. त्यांनाच विचारा, नेमकं काय घडलं आहे ते. पण काही गोष्टी अशा असतात की... ते आम्ही पाहू. यामागे कोण आहे किंवा त्यांना रसद कोण पुरवत आहे, त्यावर कोणती कारवाई होणार का, असा प्रश्न गोगावले यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना गोगावले म्हणाले की, मंत्र्यांवर, नेत्यांवर खालच्या स्तरावर बोलण्यासाठी पॉवर कोण देतंय किंवा काय... आता काही लोक अशा खालच्या स्तरावरच्या टीकेचं समर्थन करताना दिसत आहेत. ते देखील असे बोलत आहेत.

Bharat Gogawale And Manoj Jarange Patil
Bharat Gogawale : पालकमंत्रिपदावर भरत गोगावले यांची मिश्किल टिप्पणी; ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी...’

पण याचीही काही हरकत नाही. आम्ही त्यांनाही सामोरं जात असून, मी याबाबत कालही सांगितलं असून, आज आणि उद्याही हेच सांगेन की काळजी करायची गरज नाही. कारण फडणवीस असतील किंवा शिंदे यांनी मराठा समाजाला जे जे द्यायचं आहे ते दिलं आहे. तर आणखी काही द्यायचं असेल तेही देऊ. पण त्यासाठी त्यांनी योग्य वाटचाल करावी, इतकेच आम्हाला वाटतं, असल्याचे गोगावले यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com