Kokan Politics : दोन कट्टर विरोधकांची भेट अन् शिवसेनेत अस्वस्थता, तटकरेंच्या भेटीनंतर गोगावलेंना थोरवेंचा सूचक टोला; 'आम्ही केलेला संघर्ष...'

Bharat Gogawale Meets Sunil Tatkare : रायगडच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली असून भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या घरी भेट दिली. यावरून शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता वाढल्याचे दिसत आहे.
Bharat Gogawale visit Sunil Tatkare Residence; Mahendra Dalvi
Bharat Gogawale visit Sunil Tatkare Residence; Mahendra Dalvisarkarnama
Published on
Updated on

Raigad News : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही ना काही कारणावरून वादाची ठिणगी पडत असते. पालकमंत्रीपदावरील वादामुळे तटकरे आणि गोगावले यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत असतानाच एका घटनेनं मात्र रायगडच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नवनियुक्त पालकमंत्री गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गौरी-गणपतीचे दर्शन घेतले. यावरून आता शिवसेनेत अस्वस्थता वाढल्याचे दिसत असून राजकारणात काहीही शक्य आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान आमदार महेंद्र दळवी यांनी नाराजी व्यक्त करत गोगावलेंना सूचक टोला लगावला आहे.

कोकणातील रायगड जिल्ह्यात एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद अद्याप शांत झाला नसून शिवसेनेचे दोन आमदार खासदार तटकरेंवर आरोप करताना दिसत आहेत. मात्र पालकमंत्री गोगावले हे तटकरेंशी जुळवून घेताना दिसत आहे. सध्या अशाच एका भेटीवरून रायगडमधील राजकारण चांगलेच तापले आहे.

राज्याचे रोजगार व हमी योजना मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी १७ सप्टेंबरला खासदार तटकरेंच्या सुतारवाडी येथील घरी भेट दिली. त्यांनी गौरी-गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी खा. सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि कुटुंबीय उपस्थित होते.

Bharat Gogawale visit Sunil Tatkare Residence; Mahendra Dalvi
Bharat Gogawale : तटकरेंच्या समोरच गोगावलेंचा ग्रामस्थांना मोठा शब्द; 'पालकमंत्रीपद पणाला लावावे लागले तरी मागे हटणार नाही'

या भेटीचे फोटो अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेतून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी या भेटीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर तटकरे हे गोगावले यांच्या निवासस्थानी आले असते का, असा सवाल उपस्थित केला आहे.

आमदार दळवी यांनी या भेटीवरून गोगावलेंना सूचक टोला लगावला असून 'गणपतीबाप्पाचे दर्शन घेणे चुकीचं नाही परंतू आम्ही केलेला संघर्ष आणि त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंनी घेतलेली ही भूमिका चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा गोष्टी गोगावलेंनी टाळाव्यात असा सल्ला देखील दळवींनी गोगावलेंना दिला आहे.

याचबरोबर दळवी यांनी तटकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले असून राष्ट्रवादी पक्षावर नाही तर आमची नाराजीही तटकरे यांच्या वर आहे. तटकरेंनी अनेकांना रस्त्यावर आणून सोडण्याचे काम केले आहे. यामुळेच तटकरे कुटुंबावर आमची नाराजी असल्याचे दळवी यांनी म्हटले आहे.

Bharat Gogawale visit Sunil Tatkare Residence; Mahendra Dalvi
Bharat Gogawale: गोगावलेंच्या विधानानं खळबळ! पालकमंत्रीपदाचं श्रेय दिलं तटकरेंना; रायगडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

एकीकडे याभेटीवरून रायगडचे राजकारण चांगलेच तापले असून शिवसेनेतून नाराजी व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे आमदार महेंद्र दळवी देखील बोचरी टीका करताना दिसत आहेत. पण या टीकेवर अद्याप राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्यांकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. पण भरत गोगावले आणि सुनील तटकरे हे या टीकेवर काय बोलतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com