Bhaskar Jadav, Ramdas Kadam  sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav Targets Ramdas Kadam :'रडक्या, बामलाव्या, गद्दार...', भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर तोफ डागली

Shiv Sena News : गद्दारांचा कडेलोट करा, हे सांगण्यासाठी म्हणून आम्ही आज तुमच्याकडे आलो आहोत. आपल्या उमेदवारांच्या समोरचं बटन दाबलं की त्या गद्दारांचा कडेलोट झाला म्हणून समजा

सरकारनामा ब्यूरो

Raigad : उद्धव ठाकरे गेले दोन दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या सभांना मिळणार प्रतिसाद पाहून कोकणातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा असल्याची चर्चा आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे गटाकडून भाजपसोबत शिंदे गटावर जहरी टीका करताना पुन्हा एका 50 खोक्यांचा मुद्दा उकरून काढला. तर, शिंदे गटातील नेते रामदास कदम यांना भास्कर जाधव यांनी टार्गेट केले. (Bhaskar jadhav Targets Ramdas Kadam )

हे गद्दार ज्यावेळी तिकडे गेले त्या वेळेला त्यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले म्हणून हिंदुत्व संपलं,असा आरोप केला. आता ते अजित पवारांच्या सोबत सत्तेत आहेत मग आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं? 50 कोटींसाठी गद्दारी केली,असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. जाधव यांनी आपल्या आक्रमक शैलीत शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचा समाचार घेतला. 'तो येडा, आमच्या इकडचा रामदास कदम, बोबल्या.. बामलाव्या.. कसा रडतो पाहिलात ना? त्याला कशाला मंत्री केला हे मला समजत नाही. त्याला काही प्रशासनातलं कळत नाही. मूर्खातला मूर्ख आहे तो', अशा शब्दांत भास्कर जाधव (Bhaskar jadav) यांनी रामदास कदमांवर (Ramdas Kadam) जहरी टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

गद्दारांचा कडेलोट करा, हे सांगण्यासाठी म्हणून आम्ही आज तुमच्याकडे आलो आहोत.आपल्या उमेदवारांच्या समोरचं बटन दाबलं की त्या गद्दारांचा कडेलोट झाला म्हणून समजा. हा कडेलोट करण्याकरता तुम्हाला निर्धार करावा लागणार आहे, असे जाहीर आवाहन भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात केले. तसेच लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही देखील भास्कर जाधव यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी न्याय दिला

उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्राची काळजी घेतली. राज्यातील दहा हजार किलोमीटर रस्ते करण्याचे उद्दिष्ट उद्धव ठाकरेंनी ठेवले. मुख्यमंत्री असताना अजितदादांनी मांडलेले अर्थसंकल्पात उद्धव ठाकरे यांनी तरतूद केली. केंद्र सरकारने खासदारांना मिळणाऱ्या पाच कोटी रुपयांचा निधी कोरोना कालावधीत गोठवला मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मिळणारे दोन कोटीचा निधी हा पाच कोटी रुपये केला, उद्धव ठाकरेंनी खऱ्या अर्थाने न्याय दिला, असे भास्कर जाधव म्हणाले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT