Dhananjay Munde : आरोपी राहिले बाजूला, कृषीमंत्री मुंडेंचा ठेवीदारांनाच अजब प्रश्न; म्हणाले...

Money Scam Cooperative Sector : जिजाऊ माँसाहेब सोसायटीतील 200 कोटींचा आर्थिक घोटाळा, ठेवीदार संघर्ष कृती समितीने धरणे आंदोलन
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : बीडमधील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमध्ये सहा महिन्यांपूर्वी 200 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहेत. फरार संचालक आरोपींना अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी तत्काळ द्याव्यात, संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करावा, आदी मागण्यांसाठी ठेवीदारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांची बीडचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी भेट घेतली. त्यांनी मात्र ठेवीदार आंदोलकांनाच, तुम्हाला ठेवी ठेवताना समजले नाही का, असा अजब प्रश्न विचारल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Dhananjay Munde
Ganpat Gaikwad Firing : मोठी बातमी! भाजप आमदार गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर पोलिसांसमोरच गोळीबार

या आर्थिक घोटाळाप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक आरोपींना अटक केली नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी बबन शिंदे, अश्विनी पांढरे, मनीष शिंदे आर्थिक गुन्हे शाखेच्या निष्क्रीयेतेमुळे फरार झाल्याचा आरोप ठेवीदारांनी केला. यावेळी कृषीमंत्री मुंडेंनी आंदोलकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातच उलट प्रश्न केल्याने ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाले.

Dhananjay Munde
Ganpat Gaikwad Firing : आमदार गायकवाडांनी 'या' कारणामुळे केला महेश गायकवाडांवर गोळीबार

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, या प्रकरणी पोलिस अधीक्षकांना विचारणा करणार आहे. कोणी हलगर्जीपणा केला असेल, तर कुठल्याही अधिकाऱ्यांना वाचविले जाणार नाही. एमपीआयडीचे प्रस्तावही लवकरच जातील. गरिबांना फसवून त्यांचे घर उद्धस्त करणाऱ्यांना सोडणार नाही, असे ठोस आश्वासन दिले. यावेळी ठेवीदार काही कायदेशीर बाबी सांगत होते. त्यावर, कायदा मला सांगता पण डिपॉझिट करताना लक्षात आले नाही का, असा उलट प्रश्न मुंडेंनी ठेवीदारांना केला.

Dhananjay Munde
MLA Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाडांना मस्ती आली कुठून?

या प्रकरणी पोलिस तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. ठेवीदार संघर्ष कृती समितीने धरणे आंदोलन केले. त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आल्यानंतर ठेवीदारांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी अशोक हिंगे, मारुती तिपाले यांच्यासह ठेवीदारांनी म्हणणे मांडले. यावेळी मारुती तिपालेंनी संचालकांच्या मालमत्ता जप्तीसंदर्भात कायदेशीर बाबी सांगत आपली बाजू मांडली. सुरुवातीला पालकमंत्री मुंडे ठेवीदारांची बाजू ऐकत होते. मात्र, नंतर त्यांनी डिपॉझिट ठेवताना लक्षात आले नाही का, असा थेट सवाल केल्याने ठेवीदारांना शांत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.

(Edited by Sunil Dhumal)

Dhananjay Munde
Uddhav Thackeray On Tatkare : 'घराणेशाही नको म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी आता तटकरेंना...'; ठाकरेंची तोफ धडाडली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com