bhaskar jadhav uddhav thackeray
bhaskar jadhav uddhav thackeray sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंबाबत भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद; म्हणाले, "मी कधीही..."

सरकारनामा ब्युरो

2019 साली मला मंत्री केलं नाही. नंतर झालेल्या गटनेता निवडीत मला डावलण्यात आलं. पण, याबद्दल मी आजवर कधीही नाराजी व्यक्त केली नाही. अथवा कोणतंही भाष्य केलं नाही, अशी खदखद शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत ( Uddhav Thackeray ) व्यक्त केली. ते चिपळूणमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करत होते.

भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) म्हणाले, "महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपवाले सकाळ-संध्याकाळ उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत होते. पण, ज्यांना उद्धव ठाकरेंनी मंत्रीपदं दिली, त्यातील किती मंत्र्यांनी तेव्हा भाजपविरोधात तोंड उघडली होती? मला मंत्रिपद मिळालं नाही, म्हणून गप्प बसलो नव्हतो. भाजप नेत्यांच्या विरोधात सभागृहात आणि बाहेर संघर्ष करत राहिलो."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मोठेपणा वाढवण्यासाठी मी कधीही बोललो नाही"

"मला हक्काचं मंत्रिपद मिळायला हवं होतं, असं मी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला बोललो होतो. तेव्हा मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही नाराज आहात का? पण मी अन्याय हा शब्द न वापरता मी यत्किंचतही नाराज नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर स्वत:चा मोठेपणा वाढवण्यासाठी मी कधीही बोललो नाही. पण, काही लोक बोलत असतात," असं भास्कर जाधवांनी म्हटलं.

"पक्षानं मला गटनेता केलं नाही, पण..."

"पक्ष फुटल्यानंतर गटनेता बदलण्याची वेळ आली. त्यावेळी मी तिथे होतो. पण, पक्षानं मला गटनेता केलं नाही. मात्र, मी कधीही तोंड उघडलं नाही, भाष्य केलं नाही, सभागृहात संघर्ष करायचा थांबवला नाही," असं भास्कर जाधवांनी सांगितलं.

"...तर तुमच्याबरोबर येणार नाही, असं ठाकरेंना सांगितलं"

"आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेल्यावर मी गावी होतो. तातडीनं मला मुंबईत बोलावण्यात आलं. तेव्हा झालेल्या बैठकीत मी एकट्यानं उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं, की तुम्ही जर भाजपबरोबर सरकारमध्ये जाणार असाल, तर मी तुमच्यासोबत येणार नाही," असा किस्साही भास्कर जाधवांनी सांगितलं.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT