पुण्यात मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचं भूमिपूजन पार पडलं. या कार्यक्रानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) एकाच मंचावर आले होते. दोघांमध्ये असलेल्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते. पण, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांना बोलणं टाळलं. तसेच, शुक्रवारीच ( 8 मार्च ) सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेतली होती. त्यामुळे अजित पवार ( Ajit Pawar ) आणि सुप्रिया सुळेंमध्ये 'अबोला' का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बारामतीत 2 मार्चला 'नमो महारोजगार' मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र, सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या शेजारून गेल्या, पण त्यांच्याकडे पाहिलं नव्हतं. त्यानंतर पुन्हा आज पुण्यातील कार्यक्रमातही सुप्रिया सुळेंनी अजित पवारांशी बोलणं टाळलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मग, सुनेत्रा पवार यांच्याशी गळाभेट आणि अजितदादांशी 'अबोला' का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं सुप्रिया सुळेंना विचारला. त्यावर सुळे म्हणाल्या, "अजितदादांशी बोलण्याची संधी मिळाली नाही. अजितदादा ( Ajit Pawar ) कार्यक्रमाला उशीरा आले आणि घाई असल्यानं लगेच गेले. मी कार्यक्रमाला आधीच आले होते. नंतर देवेंद्र फडणवीस आले. त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. पण, कदाचित पुणे विमानतळावरील टर्मिनलच्या उद्घाटनासाठी जाण्याची घाई अजितदादांना होती."
दरम्यान, राज्याच्या राजकारणात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण, शुक्रवारी ( 8 मार्च ) महाशिवरात्रीनिमित्त बारामती तालुक्यातील जळोची येथे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दर्शनासाठी गेल्या असता समोरा-समोर आल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.